ठाण्यात आरोग्य विभागात भरती! 10,12वी,पदवीधरही करू शकतात अर्ज

156

ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूनचना देखील जारी करण्यात आली असून इच्छुकांसाठी ही चांगली संधी असल्याचे सांगण्यात येत आहे. पदांसाठी पात्र असलेले उमेदवार हे ऑफलाईन पद्धतीने पदभरतीसाठी अर्ज करू शकरणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर असणार आहे.

आरोग्य विभागात 280 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. सुपर स्पेशालिस्ट,दंत चिकित्सक,वैद्यकीय अधिकारी,क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट,मानसोपचार तज्ज्ञ,ऑडिओलॉजिस्ट,आहारतज्ज्ञ,समुपदेशक,मानसोपचार परिचारिका,लेखापाल,तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी ही भरती होणार आहे.

(हेही वाचाः सुट्ट्या संपल्या आता कामाला लागा, नोव्हेंबरमध्ये बँक हॉलिडेचा दुष्काळ)

काय आहे पात्रता

डीएम,एम डी,बीडीएस,एमबीबीएस,बीएएमएस,बीयूएमएस,बीएचएमएस,एमसीए,एमए,बीसीए,एमएसडब्ल्यू,जीएनएम,बीएससी(नर्सिंग),पदवीधर,10वी,आयटीआय,12वी,डीएमएलटी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आहे. खुल्या वर्गासाठी अर्जाचे शुल्क 300 तर मागासवर्गीयांसाठी अर्जाचे शुल्क 200 रुपये इतके आहे.

इथे सादर करा अर्ज

यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करायचा असून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,चौथा मजला,राष्ट्रीय आरोग्य अभियान,कन्या शाळा आवार,जिल्हा परिषद, ठाणे इथे हा अर्ज सादर करावा लागणार आहे.

(हेही वाचाः ऑस्ट्रेलियात भारताच्या सामन्यांनाच जास्त गर्दी, ऑस्ट्रेलियन टीमकडे चाहत्यांनी फिरवली पाठ, हताश वॉर्नर म्हणतो…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.