सरकारी नोकरी शोधताय? मग ही आहे सुवर्णसंधी

142

सरकारी नोकरी मिळावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी अनेक विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. महाराष्ट्राची लालपरी बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर महामंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळात आता १० हजार कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : आनंदाची बातमी! पुणे परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार? )

कंत्राटी भरती 

एसटी प्रशासनाने वाहकांची भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ट्रॉयमॅक्स कंपनीकडून राबवण्यात येणार आहे. वेळोवेळी विनवणी आणि आवाहन करुनही संपकरी कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला असून ही भरती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.

कर्मचारी विलीनीकरणार ठाम

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर हा अहवाल विधिमंडळ सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आला. या अहवालात एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरुच आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यानंतर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.