मुंबई महापालिकेतील जेंडर बजेटच्या महिला व बालकल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरता कंत्राटी तत्वावर ११३ समुदाय संघटक पदे भरण्यासाठी मागवलेल्या अर्जाने दहा महिने उलटत आले तरी नियोजन विभागाच्या माध्यमातून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ही कंत्राटी भरती लटकलेली असून खरोखरच ही भरती करायची आहे की केवळ भरतीचा फार्स निर्माण करायचा आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे उमेदवाराकडून हे अर्ज मागवून नियोजन विभागाने बेरोजगारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेतील जेंडर बजेटच्या महिल व बालकल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरता कंत्राटी तत्वावर ११३ समुदाय संघटक पदे भरण्यासाठी महापालिकेच्यावतीने अर्ज २८ जून २०२२ पर्यंत हे अर्ज मागवले होते. दादर पश्चिम येथील हॉकर्स प्लाझा इमारतीतील सहायक आयुक्त (नियोजन) विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने अर्ज पाठवण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. ही भरती कंत्राटी तत्वावर ठोक मानधनावर केली जाणार असून प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये एवढे मानधन दिले जाईल असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते.
(हेही वाचा- BMC : मुंबईतील सर्व मॅनहोलचे सर्वेक्षण करा; महापालिका आयुक्तांचे विभागीय सहायक आयुक्तांसह खाते प्रमुखांना निर्देश)
त्यानुसार अकरा महिन्यांच्या या ११३ कंत्राटी समुदाय संघटकांच्या पदांकरता तब्बल ४ हजार २०० अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जांची छाननी करून यातून पात्र उमेदवारांची निवड यादी तयार केली जाईल तसेच यासाठीची प्रतीक्षा यादी तयार करून लवकरच प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती विभागाने दिली होती. यादी तयार होऊन दहा महिने उलटले तरी यावर नियोजन विभागाला पुढील कोणतीही कार्यवाही करता न आल्याने सर्व अर्जाची छाननी होऊन तसेच यादी तयार होऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे जर या पदांची आवश्यकता नव्हती तर ही पदे भरण्यासाठी जाहिरात का दिली असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community