दहावी पास आहात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ३०२६ पदांची भरती

सरकारी नोकरी मिळावी याकरता अनेक विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३ हजार २६ रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती उमेदवारांना उपलब्ध होईल.

( हेही वाचा : बनावट आधारकार्ड कसे ओळखाल? )

महाराष्ट्रात ३ हजार २६ जागांसाठी भरती 

संपूर्ण भारतात अधिकृत सूचनेनुसार पोस्ट ऑफिसच्या ३८ हजार ९२६ रिक्त पदांची भरती केली जात आहे. तर यात महाराष्ट्रातील ३ हजार २६ जागा रिक्त आहेत. पोस्टामधील भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

नियम व अटी 

  • पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या- ३ हजार २६ जागा
  • शैक्षणिक पात्रता- १० उत्तीर्ण
  • नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
  • वयोमर्यादा- १८ ते ४० वर्षे
  • अर्ज शुल्क- १०० रुपये
  • अर्ज सुरू होण्याची तारीख- २ मे २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- ५ जून २०२२
  • अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here