मुंबई महापालिकेत ४२१ साह्यकारी परिचारिकांची भरती: सोमवारपासून अर्ज स्वीकारणार

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील साह्यकारी परिचारिका अर्थात प्रसविका या श्रेणीतील तब्बल ४२१ पदे आता भरण्यात येणार आहे. या पदांसाठी १६ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत (शनिवार व रविवार वगळून )मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ मुंबई ४०००१२ या पत्त्यावर अर्ज करण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन महापालिकेने केले आहे.

( हेही वाचा : सैफी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी समोर आली मोठी माहिती )

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ या संवर्गातील ४२१ पदे भरण्या संदर्भात जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

  • सर्वसाधारण गट : २७०
  • खेळाडू ५ टक्के : २०
  • प्रकल्पग्रस्त ५ टक्के : २०
  • भूकंप ग्रस्त २ टक्के : ०८
  • माजी सैनिक १५ टक्के : ६३
  • पदवीधर, पदविकाधारक अंशकालिन १० टक्के : ४०
  • वेतनश्रेणी : २५,५०० -८१,१००

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here