पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती!

लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना काळात पोलीस भरती होऊ शकली नव्हती. परंतु आता लवकच महाराष्ट्र पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रकारची तडतोड केली जाणार नाही असेही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस अॅकेडमीच्या ११९ व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात सांगितले.

( हेही वाचा : आता पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचणं होणार बंद, पश्चिम आणि मध्य रेल्वेचा ‘हा’ आहे प्लॅन )

७ हजार २३१ पदांची भरती

लवकरच पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती करण्यात येणार आहे. पोलीसात आता शिपाई म्हणून रूजू झालेले कर्मचारी सेवा निवृत्त होताना खात्रीपूर्वक सब इन्स्पेक्टर होईल अशा पद्धतीने पोलीसांच्या पदोन्नतीची रचना करण्यात आली आहे.

काही महत्वपूर्ण निर्णय

  • पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती
  • पदोन्नती रचना
  • पोलीस स्टेशन बांधकाम व नुतनीकरण
  • जवळपास १ लाख घरे बांधण्याचा निर्णय
  • महिला पोलिसांना आठ तास ड्युटी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here