महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड यासाठी पदभरती परीक्षा टीसीएस, आयबीपीएस अंतर्गत घेतल्या जाणार आहेत. या माध्यमातून ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
( हेही वाचा : नेमबाजीत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला २ कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. तसेच या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगाभरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. यानुसार आता पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांची निवड करण्यात आली आहे.
गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांवर लवकरच भरती निघणार आहे.
रिक्त जागा वाढण्याची कारणे
दरवर्षीची सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती यामुळे बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, पशुसंवर्धन या विभागांमधील रिक्त जागा वाढल्या आहेत.
Join Our WhatsApp Community