मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात या पदांसाठी भरती: अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल

मुंबईत महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणा-या कोविड १९ लसटोचणी कार्यक्रमसाठी कंत्राटी तत्त्वावर शित सल्लागार, औषध निर्माता(फार्मसिस्ट),संगणक सहायक आणि श्रमिक यांची तब्बल ४५ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये संगणक सहायकची ३० पदे आणि श्रमिकच्या १२ पदांचा समावेश आहे. सोमवारी २५ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून येत्या बुधवारी २७ एप्रिल २०२२ रोजी दुपारी चार वाजेपर्यंत हे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वॉक-इन-सिलेक्शन’ पद्धतीने ही भरती करण्यात येत आहे.

या इमेल आयडीवर पाठवा अर्ज

२५.०४.२०१२ रोजीच्या जाहिरातीनुसार ईमेल आयडी
[email protected]rediffmail.com वर २७.०४.२०१२ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. ईमेल आयडी covid [email protected] वर स्कॅन करून PDF स्वरूपात पाठवण्यात यावे. निवड झालेल्या उमेदवारांना दूरध्वनी द्वारे कळवण्यात येईल अनुक्रमे क्र.१.२.३.४ पदांना या कार्यालयात कोविड- १९ कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उर्वरीत उमेदवारांची प्रतिक्षा यादी या कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल.  २७.०४.२०१२ रोजी दुपारी ४.०० नंतरचे प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
सविस्तर माहिती व अर्ज सहाय्यक आरोग्य अधिकारी(बिलका), खोली क्र. ३२. दुसरा मजला, एफ/ दक्षिण मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल, मुं.-१२ यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल.
—-

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here