बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये ‘डीएनबी’ (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेची सर्व रुग्णालये अविरतपणे कार्यरत आहेत. याचाच एक भाग म्हणून नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा-सुविधा मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या काही रूग्णालयांमध्ये ‘डीएनबी’ अभ्यासक्रमही काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. ‘डीएनबी’ हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी ८२ पदे असून यानुसार ३ वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीत २४६ विद्यार्थी उपलब्ध होऊ शकणार आहेत. या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यामुळे अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यास मदत होते, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.
सहा उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे नियमित कामाव्यतिरिक्त अवघड, गुतांगुतीच्या व दुर्मिळ शस्त्रक्रिया व उपचार आता येथे केले जातात. ऑडीओमॅट्री, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग (आयपीसीयू), इ विभाग नव्याने सुरु करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथे डायलेसिस कक्ष डीएनबी शिक्षकांच्या सहाकार्याने महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येत आहेत. तसेच कर्णबधिर रुग्णांवर उपचार म्हणून कॉकलिअर इमल्पांट शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयांत केल्या जातात. तसेच २०० हून अधिक रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान करणे इत्यादी बाबी या अभ्यासक्रमातील तज्ज्ञ शिक्षकांमुळे सुलभ झाले आहे. वरील उपचार उपनगरीय रुग्णालयामध्ये उपलब्ध होत असल्याने मोठया रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे, अशी माहितीही या निमित्ताने डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.
(हेही वाचा Independence Day : येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान पुन्हा घरोघरी तिरंगा फडकणार!)
‘या’ रूग्णालयांमध्ये होणार भरती
कुर्ला भाभा ४२ पदे
या भरतीअंतर्गत वैद्यकीय शिक्षकांची ३४ आणि इतर ८ अशी एकूण ४२ पदे भरण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरातील कुर्ला (पश्चिम) परिसरातील खान बहादूर भाभा सर्वोपचार रूग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात १, जनरल मेडिसिन विभागात ३ पदे, यानुसार ४ पदे भरण्यात येणार आहेत.
राजावाडी ५ पदे
घाटकोपर परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनाजी अमीदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय राजावाडी येथे रेडिऑलॉजी विभागात २, कान, नाक आणि घसा विभागात १, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात १, जनरल सर्जरी विभागात १, अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय
पश्चिम उपनगरातील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रूग्णालयातील पेडीअॅट्रीक विभागात १, स्कीन अॅंड व्ही. डी. विभागात २ आणि अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.
वांद्रे भाभा रुग्णालय १२ पदे
वांद्रे (पश्चिम) येथील खुरशादजी बेहरामजी भाभा सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात २, पेडीअॅट्रीक विभागात २, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २, रेडिऑलॉजी विभागात २, पॅथॉलॉजी विभागात १ आणि कान, नाक, घसा विभागात १ अशी एकूण १२ पदे भरण्यात येणार आहेत.
गोवंडी शताब्दी रुग्णालय ३ पदे
गोवंडी परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी सर्वोपचार रूग्णालयात जनरल मेडिसिन १, अॅनॅस्थेसिओलॉजी आणि रेडिओलॉजी विभागात २, अशी एकूण ३ पदे भरली जाणार आहेत.
सांताक्रुझ व्ही एन देसाई रुग्णालय ८ पदे
सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात १ तर रेडिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच याच रूग्णालयांमध्ये शिक्षकांशिवाय इतर ८ पदे देखील भरण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community