MPSC मार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. याबाबत संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे…
( हेही वाचा : 11th Admission : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक )
MPSC गट – क भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदाच्या एकूण २२८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे.
अटी व नियम
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
- पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक – टंकलेखक
- पद संख्या -२२८ जागा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १ ऑगस्ट २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०२२
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
संचालक, तालुका अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत संचालक, तालुका अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून MPSC ने अर्ज मागवले आहेत.
अटी व नियम :
- पदाचे नाव – संचालक, तालुका क्रीडा अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी
- पद संख्या – २१
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
अमागास – ७१९ रुपये
मागासवर्गीय – ४४९ रुपये - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १ ऑगस्ट २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०२२
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in