सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असून MPSC अंतर्गत राज्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, भाषा संचालक पदांच्या एकूण 433 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.
( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत भरती सुरू; जाणून घ्या पात्रता व नियम)
अटी व नियम
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक, भाषा संचालक
- पद संख्या – 433 जागा
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/- - अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जुलै 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
- अर्ज https://mpsc.gov.in/ संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
मुख्य परीक्षा असणार वर्णनात्मक
MPSC ने काही दिवसांपूर्वी राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक होईल अशी घोषणा करून त्याचे प्रसिद्धपत्रक काढले होते. आता आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबतचा निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाने जाहीर केला आहे.
Join Our WhatsApp Communityराज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/fTh3slTGBm
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 24, 2022