Heavy Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट; घाट परिसरात भूसख्खलनाची भीती

308
Heavy Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट; घाट परिसरात भूसख्खलनाची भीती
Heavy Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट; घाट परिसरात भूसख्खलनाची भीती

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता कोकण, मध्य महाराष्ट्रात भारतीय वेधशाळेने अतिवृष्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागात ३०० मिमीपर्यंत पाऊस होण्याची भीती भारतीय वेधशाळेचे उपमहासंचालक एम. मोहापात्रा यांनी व्यक्त केली. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात जमीन खचण्याची भीती असल्याने प्रवास टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारी दोन वाजता पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी मुंबई, ठाण्यात अतिवृष्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. भारतीय वेधशाळेचे उपमहासंचालक यांनी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Asia Cup 2023 : अखेर प्रतीक्षा संपली! आशिया चषकाचे वेळापत्रक होणार जाहीर)

कोकण भागात पूरजन्य परिस्थिती उद्भवेल आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवू शकते. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन भारतीय वेधशाळेने केले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यात सावित्री, अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कुंडलिका आणि पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने दुपारी तीन वाजता दिली. वाशिष्टि नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नजीकच्या शहरात पाणी शिरले. मुंबईत लोकलसेवा दुपारनंतर बऱ्याच प्रमाणात विस्कळीत झाली होती. हार्बर लाईनवरील पनवेल स्थानक येथे लोकल सुरु नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. पनवेल येथील रसायनी येथे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.