मुंबईसह पालघर आणि ठाण्यात शुक्रवारी पडला पाऊस नसला तरीही दक्षिण कोकणात पावसाचे थैमान सुरु होते. या भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर कायम आहे. परिणामी, शुक्रवारी दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रेड अलर्टसह कायम ठेवला आहे. या भागांत किमान ६४.५ ते २०४.५ मिमी पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. परंतु काही भागांत २०४ मिमीहून जास्त पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट
जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. जुलैच्या सुरुवातीला दक्षिण कोकण आणि कोल्हापूरातील बहुतांश भागांत एकाच दिवसात दोनशेहून अधिक पावसाची नोंद झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. पावसासाठी किनारपट्टीवर निर्माण झालेले पोषक वातावरण अद्यापही कायम असल्याने वीकेण्डलाही पाऊस पडेल असे वेधशाळेच्या अधिका-यांनी सांगितले.
( हेही वाचा : मालाड जलाशय दुघर्टना : स्थानिकांना पर्यायी घरे उपलब्ध होणार चार दिवसांमध्ये )
गुजरात राज्याजवळ पावसााचा जोर सुरुच असल्याने नाशिमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळता संपूर्ण दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट राहील. रत्नागिरी, पुण्यात सोमवारी आणि मंगळवारी, तर साता-यात फक्त सोमवारी रेड अलर्ट राहील.
Join Our WhatsApp Community