मुंबईत ४ दिवस ऑरेंज अलर्ट!

येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होणार आहे, असे हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले.

मुंबईत पावसाने अशी काही ओपनिंग केली त्यात महापालिकेचे नालेसफाईचे सर्व दावे वाहून गेले आहेत. मुंबईत सर्वत्र  पाणी तुंबले आहे. तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. हवामान खात्याने मुंबईत बुधवारी, ९ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुढील ४ दिवस मुंबईत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री हाय अर्लट! 

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले. वाहतुकीची कोंडी झाली, वरळी, प्रभादेवी, हिंदमाता, सायन आणि चुनाभट्टी येथे  गुडघाभर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. लोकल सेवा बंद पडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. महापालिकेने मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचं कंट्रोल आपत्ती निवारण कक्षात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती निवारण कक्षात येऊन मुंबईतील विविध भागांची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर टीटी किंवा हिंदमाता येथे पाहणी करण्यासाठी न येता ते थेट पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात आले. या कक्षातून त्यांनी अवघ्या पाचच मिनिटात संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला.

(हेही वाचा : पावसाने मुंबईला झोडलं, भाजपने शिवसेनेला झोडलं)

कोकण किनारपट्टीला रेड अ‍ॅलर्ट

९ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होणार आहे, असे हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले.

मुंबईत पाच मुसळधार पावसाचे! 

कोकण किनारपट्टीनंतर मुंबईत रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहितीही शुभांगी भुते यांनी दिली आहे.

(हेही वाचा : नालेसफाई की मुंबईकरांशी ‘बेवफाई’?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here