राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना बोचणार ‘गुलाब’चे काटे! रेड व ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही 28 व 29 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. 28 सप्टेंबर रोजी तेलंगणा राज्यात वादळाचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे तेलंगणाशी संलग्न असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पुढील 6 तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे राज्यात 28 व 29 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.

28 सप्टेंबर रोजी, या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट-

रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव.

या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-

मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली.

29 सप्टेंबर रोजी या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-

रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार.

30 सप्टेंबर रोजी मात्र राज्यातील कुठल्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे 30 सप्टेंबर नंतर राज्याला वादळाचा कुठलाही धोका नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here