१८०० विशेष अतिथींना निमंत्रण
लाल किल्यावर होणाऱ्या समारंभासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या सुमारे १८०० जणांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कें विशेष अतिथीमध्ये गावांचे ४०० सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील २५० व्यक्ती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमधले प्रत्येकी ५० व्यक्ती, सेन्ट्रल विस्टा प्रकल्प, नवे संसद भवन, सीमावर्ती भागातली रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजना यासाठी काम करणारे ५० श्रमयोगी (बांधकाम मजूर), ५० खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छिमार वर्गातले प्रत्येकी ५० जणांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधल्या ७५ जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक वेशात आमंत्रित करण्यात आले आहे.
विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सल्फी पॉइंटस’
केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे सेल्फी पॉइंटस’ यामध्ये जागतिक आशा : लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.
१२ महत्वाच्या ठिकाणी हे सेल्फी पॉइंटस’ उभारण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे.
(हेही वाचा – Heron Mark-II drone: हेरॉन मार्क-II ड्रोन एकाचवेळी ठेवणार चीन-पाक सीमेवर लक्ष)
ऑनलाईन सेल्फी स्पर्धा
स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर १५ ते २० ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या १२ पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
हेही पहा –