– विशेष प्रतिनिधी, मुंबई
माहिम पश्चिम येथील मोहम्मद छोटानी क्रॉस रोड क्रमांक २ वर असलेल्या विश्राम इमारतीचा पुनर्विकास (Redevelopment of Building) मागील ७ वर्षांपासून सुरू आहे; परंतु मागील २ दिवसांपासून या इमारतीचे बांधकाम हे विकासक आणि ठेकेदार यांच्या वादात अडकले गेले आहे. अमराठी ठेकेदाराची वकिली करत शिवसेना उबाठा गटाच्या विभागप्रमुखानेच या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम थांबवल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे विश्राम इमारतीच्या पुनर्विकासात महेश सावंत उभा ठाकला गेल्याने शिवसेना उबाठा ही आता मराठी माणसांच्याही मुळावर उठायला लागली का? असा प्रश्न रहिवाशांकडून केला जात आहे.
माहिम पश्चिम येथील छोटानी क्रॉस रोडवरील विश्राम इमारतीमध्ये एकमेव अमराठी भाडेकरू वगळता सर्व मराठी कुटुंबे असून ही सर्व कुटुंबे प्रथमपासूनच शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी या सर्व भाडेकरूंनी जून २०१६मध्ये आपली घरे खाली करून दिली. इमारतीच्या पुनर्विकासासाठी नेमलेल्या जीवनदीप डेव्हलपर्स यांनी सर्व घरे खाली करून दिल्यानंतर इमारत पाडून त्यावर पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात केली. यासाठी विकासकाने पटेल कंपनीला ठेकेदार म्हणून नेमल्यानंतर त्यांनी काम केले; परंतु या ठेकेदाराने पायलिंग आणि प्लिंथचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू ठेवल्याने रहिवाशांच्या तक्रारीनुसार विकासकाने ठेकेदार बदलून नवीन ठेकेदाराची नेमणूक करून पुढील कामाला सुरुवात केली. पटेल कंपनीला विकासकाने आतापर्यंतचे सर्व देय असलेली रक्कम दिलेली असून केवळ ७० ते ८० लाख रुपयांची रक्कम देय आहे, ज्याचे विकासकाने त्यांना आगावू चेक देऊन ठेवले आहेत आणि मी सांगेन त्याप्रमाणे बँकेत डिपॉझिट करावे, अशा सूचना केल्या आहेत.
(हेही वाचा – Panvel Municipal Corporation: मुंबईनंतर आता पनवेललाही उभारणार संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी विशेष रुग्णालय, कसे असेल? वाचा सविस्तर… )
इमारतीचा पुनर्विकास जलगदतीने करण्याची विनंती
त्यामुळे नवीन ठेकेदारामार्फत या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच मागील दोन दिवसांपासून या विश्राम इमारतीचे बांधकाम शिवसेना उबाठा गटाच्या विभागाप्रमुखाने थांबवले आहे. रहिवाशांनी या विभागप्रमुखाला सर्व प्रकारची आर्जवी केल्यानंतरही ते मानायला तयार नाही आणि त्यांनी काम थांबवले. त्यामुळे एकही गाडी ते या ठिकाणी यायला देत नाहीत. आता या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे थांबले असून आधीच या बांधकामाला ७ वर्षांचा कालावधी लोटल्याने आपल्या नव्या घरात जाण्याचे स्वप्न लांबणीवर पडलेले आहे. अनेक कुटुंबातील कर्ती धर्ती माणसे नवीन घरात जाण्यापूर्वीच मृत्यू पावली आहेत. त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास जलगदतीने व्हावा आणि आम्हाला आमच्या घरात जाऊ दे अशीच विनंती रहिवासी करत आहेत.
वाद काय आहे?
विभागप्रमुखाच्या कोणा व्यक्तीचे पैसे पटेल काँन्ट्रक्टरने घेतले असून ते पैसे वसुलीसाठी या विभागप्रमुखाने विश्राम इमारतीचे बांधकाम बंद पाडले आहे. पटेल काँन्ट्रक्टरच्या विकासकाकडे केवळ ७० ते ८० लाख रुपयांचे देणे असून तो सध्या या इमारतीचे काम करत नाही; परंतु त्या काँन्ट्रक्टरचे पैसे विकासकाकडे अडकले आहेत, त्यातून तुम्हाला पैसे देतो असे काँन्ट्रक्टरने सांगितल्याने विभागप्रमुख हा विकासकाच्या मागे लागला आहे. मुळात जो ठेकेदारच नाही आणि विकासक व ठेकेदारामधील कामांच्या पैशांच्या देवाणघेवाणीचा प्रश्न आहे तिथे विभागप्रमुखाचा काम बंद पाडण्याचा प्रश्नच काय, असा प्रश्न रहिवाशांकडून केला जात आहे.
मराठी कुटुंबांचे नव्या घरात जाण्याचे स्वप्न लांबणीवर
स्थानिक रहिवासी शशांक विरकुड यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीचे काम जलद व्हावे ही आम्हा सर्व रहिवाशांची इच्छा आहे. ज्या ठेकेदारासाठी विभाप्रमुखांनी काम बंद पाडले आहे, तो ठेकेदारच आता नाही. त्याचे जे काही देणे आहे ते विकासक आणि ठेकेदार यांच्यामधील व्यवहार आहे. यात विभागप्रमुखांचा हस्तक्षेप करण्याचा आणि बांधकाम थांबवण्याचा अधिकार येतो कुठे असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे जर विभागप्रमुखाच्या कोणा माणसाचे पैसे पटेल काँन्ट्रक्टरने अडवले असेल तर त्या पटेलची अनेक कामे सुरू आहेत, त्या साईट्सवर जाऊन त्यांनी ते बंद पाडावे; परंतु त्या ठेकेदाराचे पैसे वसूल होत नाही म्हणून आमच्या विकासकाला घाबरवून त्यांचे काम बंद पाडणे हे योग्य नाही. विकासकाच्या ताब्यात सध्या तीन फ्लॅट असून त्यातील एका सदनिकेला त्यांनी सिल मारून स्वत:कडे चावी ठेवावी किंवा तिन्ही फ्लॅट विकण्यास मज्जाव करावा; पण आम्हा मराठी कुटुंबांचे नव्या घरात जाण्याचे स्वप्न अशाप्रकारे बांधकाम थांबवून लांबणीवर का टाकले जाते, असा सवाल त्यांनी केला आहे. आपण स्वत: शिवसैनिक असून इमारतीतील सर्व शिवसेनेचेच मतदार आहेत, याची माहिती करून दिल्यानंतर ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही, असे विरकूड यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात महेश सावंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community