राज्यातील अकरावी इयतेच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासायक निर्णय घेतले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु असून पहिल्या गुणवत्ता यादीच्या अंतर्गत ५२ हजार विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. हे प्रवेशप्रक्रिया असून आता प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होणार आहे.
१५ टक्के शुल्क कपात!
दरम्यान शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांमध्ये राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना कपात केलेल्या शुल्कानुसार शुल्क घ्यावे लागणार आहे.
जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत
राखीव गटातल्या विद्यार्थ्यांनी आरक्षण गटातून प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी ३० दिवसांच्या आत जातीचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी अर्जाची पोचपावती आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचे जात प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती नाही, ते विद्यार्थी वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करू शकतात. तसेच ३० दिवसांच्या आता जात प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकणार नाही.
Join Our WhatsApp Community