गेल्या वर्षीच्या तुलनेत Road Accidents मध्ये घट; मृत्यूंची संख्या घटली

41
गेल्या वर्षीच्या तुलनेत Road Accidents मध्ये घट; मृत्यूंची संख्या घटली
गेल्या वर्षीच्या तुलनेत Road Accidents मध्ये घट; मृत्यूंची संख्या घटली

गेल्या काही वर्षांचा विचार करता राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. वाढते रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध सुरक्षाउपायांवर भर दिला गेला. तसेच प्रत्येक जिल्ह्याला रस्तेसुरक्षा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्वाच्या परिणामस्वरूप राज्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी झाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये राज्यात २ हजार ८३३ रस्ते अपघात झाले होते. त्यात १ हजार २०८ जणांनी जीव गमावला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये अपघातांची संख्या १६४ ने कमी होऊन २ हजार ६६९ रस्ते अपघात (Road Accidents) झाले. त्यात १ हजार ७७ जणांचे प्राण गेले. म्हणजेच मृत्यूच्या संख्येत १३१ ने घट झाली आहे.

(हेही वाचा – आदिवासींच्या १२ हजार ५०० पदांवर ‘बुलडोझर’ फिरवला का ? Tribal Women’s Forum यांचा सवाल)

राज्यात सर्वाधिक रस्ते अपघात वेगमर्यादचे उल्लंघन केल्यामुळे होतात. त्यामुळे वेग मयदिचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याकरिता अनेक मार्गावर ‘स्पीड डिटेक्टर’ कॅमेरे बसविले आहेत. अत्याधुनिक ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्रांद्वारे ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील महत्त्वाच्या मार्गावर इंटरसेप्टर वाहने तैनात करण्यात आली आहे.

मुंबई, पुण्यातील ग्रामीण भागात अपघात घटले

मुंबई शहरातील अपघातात घट झाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात मुंबई शहरात २१७ अपघातात २६. जणांचा जीव गेला होता. यंदा १९९ अपघातात २३ जणांनी प्राण गमावला. पुणे ग्रामीणमध्ये गेल्या वर्षी २३४ अपघातात १६७ जणांचा मृत्यु झाला होता. यंदा १३८ अपघातात ६८ जणांनी प्राण गमावला. म्हणजेच रस्ते अपघातात ९६ आणि मृत्युच्या संख्येत ९९ ने घट झाली.

कोणत्या वर्षात किती झाले अपघात ?

वर्ष                            अपघात                      मृत्यू

ऑगस्ट २०२२                २,४२१                         १,०८०

ऑगस्ट २०२३                २,८३३                         १,२०८

ऑगस्ट २०२४                २,६६९                         १,०७७ (Road Accidents)

 

हेही पहा 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.