मुंबई महापालिकेच्या ताब्यातील दादर महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलावासह दहिसरमधील मुरबाळीदेवी, कांदिवली सरदार वल्लभभाई पटेल आणि चेंबूरमधध्ल जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलाव(ऑलिम्पिक) या चार जलतरण तलावांकरता सदस्यत्व नोंदणीला आता सुरुवात होणार असून याद्वारे पहिल्या टप्प्यात ६ हजार जणांना सदस्य बहाल केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. दादर, कांदिवली व चेंबूर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये १० हजार १०० इतके आहे. तर दहिसर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये ८ हजार इतके आहे. या शुल्कामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक इत्यादींना वार्षिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत असणार आहे.
दहिसर परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव येथील प्रक्रिया आजपासून ऑनलाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर बुधवार दिनांक २४ ऑगस्ट २०२२ पासून चेंबूर (पूर्व) येथील ‘जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) आणि कांदिवली परिसरातील ‘सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) या दोन्ही जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. तर दादर परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलावाची ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहे.
( हेही वाचा : देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणासाठी नेमलेल्या सल्लागारांचे कंत्राटदारांशी साठेलोठे)
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या जलतरण तलावांकरता सदस्य नोंदणी प्रक्रिया महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते या ऑनलाईन प्रक्रियेचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, संचालक (माहिती व तंत्रज्ञान) तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे, या प्रक्रियेसाठीचे समन्वयक संदीप वैशंपायन, लेखा परिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सचिन गांगण यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
पहिल्या टप्प्यात मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ४ जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत आहे, त्यामध्ये सर्वप्रथम दहिसर परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव येथील प्रक्रिया मंगळवारी ऑनलाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर बुधवारी २४ ऑगस्ट २०२२ पासून चेंबूर (पूर्व) येथील ‘जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) आणि कांदिवली परिसरातील ‘सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) या दोन्ही जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. तर दादर परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलावाची ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी गुरुवारी २५ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार आहे. या चारही तरण तलावांसाठी एकूण ६ हजार व्यक्तिंना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्व नोंदणी दिली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणा-या वेब पेजवर अत्यंत सोपा व सुटसुटीत ऑनलाईन अर्ज आहे. हा अर्ज भरताना इतर प्राथमिक माहितीसह आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. एखाद्या सदस्याला पोहायला जायचे असल्यास त्यावेळी जलतरण तलावावर किती सदस्य पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि त्याचवेळी आणखी किती सदस्यांना तिथे प्रवेश दिला जाऊ शकतो, याची माहिती ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. यामुळे घरातून निघण्यापूर्वी ती माहिती ऑनलाईन पद्धतीने बघून त्यानंतर पोहायला जाण्याचा निर्णय अंतिम करता येणार आहे. यामुळे देखील जलतरण तलावांवरील गर्दी नियंत्रित करण्यासोबतच सदस्यांना देखील घरबसल्या अद्ययावत माहिती उपलब्ध असणार आहे.
कसा भरणार अर्ज
- अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल. दादर, कांदिवली व चेंबूर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये १० हजार १०० इतके आहे. तर दहिसर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये ८ हजार इतके आहे. या शुल्कामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक इत्यादींना वार्षिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत असणार आहे.
- यापूर्वी जलतरण तलावांच्या सदस्यांना दररोज ४५ मिनिटे पोहण्याचा कालावधी दिला जात असे. आता या कालावधीत १५ मिनिटांची वाढ करुन हा कालावधी सर्वांसाठी १ तास असा करण्यात आला आहे.
- जलतरण तलावाच्या ठिकाणी सभासदाच्या आगमन – निर्गमनावेळी ‘फेस रिगग्निशन’द्वारे स्वयंचलित पद्धतीने सभासदांची नोंदणी होणार आहे. यामुळे एखादा सदस्य निर्धारित एका तासाच्या कालावधीपेक्षा अधिक तास पोहत असल्यास, त्या व्यक्तिच्या वार्षिक सदस्यत्वाच्या कालावधीतून अतिरिक्त पोहण्याचा कालावधी स्वयंचलित पद्धतीने वजा होणार आहे. यामुळे अधिक व्यक्तिंना जलतरण तलावाचा लाभ घेणे शक्य होण्यासोबतच सुटीच्या कालावधीत जलतरण तलावांवर होणारी गर्दी नियंत्रित करणे शक्य होणार आहे.