Lonavala येथे पर्यटकांसाठी नियमावली जारी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Lonavala येथे अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे.

142
Lonavala येथे पर्यटकांसाठी नियमावली जारी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
Lonavala येथे पर्यटकांसाठी नियमावली जारी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

लोणावळ्याच्या (Lonavala) भूशी डॅमच्या (Bhushi Dam) बॅकवॉटरमधील धबधब्यात एक संपूर्ण कुटुंब वाहून गेले. यात पाच जणांना जीव गमवावा लागला. अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. या दुर्घटेनंतर लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे.

(हेही वाचा – Lieutenant General Dheeraj Seth यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला)

सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहे.

भुशी धरण बॅक वॉटरफॉलवर जाण्यासाठी बंदी असल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे. संपूर्ण जंगल परिसर असतांना देखील हे अन्सारी व खान कुटुंब दीट किलोमीटर या जंगलातून वाट काढत चालत त्या ठिकाणी गेले. धोकादायक पद्धतीने पर्यटन करणे त्यांच्या जीवावर बेतले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.