मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या Jayakwadi Damची ड्रोनने रेकी!

165
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या Jayakwadi Damची ड्रोनने रेकी!
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या Jayakwadi Damची ड्रोनने रेकी!

महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेले, तसेच राज्यातील दुष्काळी मराठवाड्यातील शेतजमिनीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरणासंबंधित एक गंभीर माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेवरून धरणाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Jayakwadi Dam)

(हेही वाचा – Pune: अनधिकृत बार-हॉटेलवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश)

मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणावर पाच ते सहा ड्रोनने टेहळणी (Drone surveillance) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटाने धरणावर पाच ते सहा ड्रोनच्या माध्यमातून अज्ञाताने टेहळणी केल्याची माहिती आहे. तसेच धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे (Engineer Vijay Kakade) यांनी सांगितले कि, मंगळवारी रात्रीच्या दरम्यान पाच ते सहा ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण धरणाची टेहळणी करण्यात आली. या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. मात्र तोपर्यंत ड्रोन धरणाच्या अतिल भागातील बेटावर दिसल्याचे काकडे यांनी सांगितले. (Jayakwadi Dam)

(हेही वाचा –Parliament Session: दोन मिनिटे मौन, काँग्रेसचे काळे कृत्य… इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर लोकसभा अध्यक्ष काय म्हणाले? )

तपास सुरू

दरम्यान, सध्या चार ते पाच दिवसापासून या ठिकाणी पोलिस कर्मचारी नसल्याचे काकडे यांनी सांगितले. तसेच याबाबत तपास सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातून अज्ञातांकडून नेमके कशाची टेहळणी करण्यात आली हे तपासानंतर समोर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  (Jayakwadi Dam)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.