Relationship Declaration : ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास आता होणार मोठी शिक्षा; सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

167
Relationship Declaration : ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास आता होणार मोठी शिक्षा; सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

मागील काही वर्षांपासून फसवणूक (Relationship Declaration) करून विवाह केल्याच्या अनेक घटना घडल्या. अनेकांनी आपली ओळख लपवून महिलेसोबत विवाह केला आणि नंतर त्यांचा छळ केला. मात्र अशा या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करायची आणि कशी करायची हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न असायचा. मात्र आता सरकारने यावर तोडगा काढण्याचे ठरवले आहे.

अधिक माहितीनुसार, विवाहित असल्याची माहिती लपवून (Relationship Declaration) अथवा आपली खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसोबत लग्न करणे अथवा तिच्या सोबत संबंध प्रस्थापित करणे हा भारतीय न्यायिक संहितेनुसार गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६९ नुसार असे करणे छळ मानले जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये १० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल. कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते.

(हेही वाचा – Onion Prices : कांद्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारी गोदामांत अतिरिक्त कांदा साठवण्याचा सरकारचा निर्णय)

यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली (Relationship Declaration) अथवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी असे केले, तर तो बलात्कार मानला जाणार नाही, मात्र छळ मानला जाईल. अशा प्रकरणांत १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्याची तयारी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, रोजगार देणे, प्रमोशन अथवा लग्नाचे आश्वासन देऊन ओळख लपवून लग्न करणे हा छळ मानला जाईल, असे या सेक्शनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय न्यायिक संहिता विधेयकावर स्थायी समितीचा मसुदा अहवाल लवकरच सादर केला जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.