Reliance Biggest Company in India : रिलायन्सचं बाजारातील भाग भांडवल २१ लाख कोटींच्या घरात

Reliance Biggest Company in India : शेअर बाजारात रिलायन्स कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी मोठी वाढ झाली. 

158
Reliance Bonus Share : रिलायन्स कंपनी भागधारकांना देणार एकावर एक बोनस शेअर
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सगळ्यात मोठी कंपनी बनली आहे. आणि शेअर बाजारातील भाग भांडवल २१ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेली ती पहिलीच भारतीय कंपनी आहे. अलीकडेच कंपनीने जिओ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीचा रिचार्ज प्लानमध्ये २५ टक्के दरवाढ केली. या निर्णयानंतर रिलायन्स कंपनीचा शेअर शुक्रवारी सुमारे २% वाढून ३,१२९ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आणि अर्थातच त्यामुळे कंपनीचे भाग भांडवल वाढले आहे. (Reliance Biggest Company in India)

४ महिन्यांपूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीने पहिल्यांदाच २० लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप ओलांडला होता. यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने १५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. २०१९ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. या वर्षी रिलायन्सचे शेअर्स २०% पेक्षा जास्त वाढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर २,५९० रुपयांवर होता, तो आता वाढून ३,१२९ रुपये झाला आहे. एका महिन्यात हा शेअर ७ टक्क्यांनी वाढला आहे. ५ वर्षांत रिलायन्सच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना १५०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. (Reliance Biggest Company in India)

(हेही वाचा – Ind W vs SA W : भारताची सगळ्यात जलद द्विशतकवीर शेफाली वर्मा)

रिलायन्स इंडस्ट्रीजचा करपूर्व नफा १ लाख कोटींच्या पुढे

बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुंबईस्थित रिलायन्स समूह तेलापासून दूरसंचार आणि रिटेलपर्यंतच्या क्षेत्रात काम करतो. यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) येते. टीसीएसचे मार्केट कॅप १४.२५ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा करपूर्व नफा १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. असे करणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १० लाख कोटी रुपयांचे विक्रमी वार्षिक उत्पन्न नोंदवले आहे. (Reliance Biggest Company in India)

रिलायन्सने २२ एप्रिल रोजी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) निकाल जाहीर केले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर १० रुपये लाभांशही मंजूर केला होता. कंपन्या नफ्यातील काही भाग त्यांच्या भागधारकांना देतात, त्याला लाभांश म्हणतात. चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १८,९५१ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते १९,२९९ कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत नफा २% कमी झाला आहे. रिलायन्स ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स सध्या हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, पेट्रोकेमिकल्स, प्रगत साहित्य आणि संमिश्र, अक्षय ऊर्जा (सौर आणि हायड्रोजन), डिजिटल सेवा आणि किरकोळ क्षेत्रात कार्यरत आहे. (Reliance Biggest Company in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.