Reliance Bonus Share : रिलायन्स कंपनी भागधारकांना देणार एकावर एक बोनस शेअर

Reliance Bonus Share : कंपनी सहाव्यांदा बोनस शेअर लागू करत आहे.

250
Reliance Share Price : शेअर बाजारातील ताज्या पडझडीत रिलायन्सचं ५.४ लाख कोटी रुपयांचं नुकसान
Reliance Share Price : शेअर बाजारातील ताज्या पडझडीत रिलायन्सचं ५.४ लाख कोटी रुपयांचं नुकसान
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने सध्याच्या भागधारकांना एकावर एक बोनस शेअर (Reliance Bonus Share) देऊ केला आहे. म्हणजो आता तुमच्याकडे रिलायन्सचे जितके शेअर आहेत ते दुप्पट होऊ शकतात. अर्थात, लवकरच त्यासाठी एक रेकॉर्ड तारीख ठरवली जाईल. त्या तारखेपर्यंत जितके शेअर भागधारकांकडे असतील त्यावर बोनस लागू होईल.

यापूर्वी १९८०, १९८१, १९८३, १९९७ , २००९ आणि २०१७ मध्ये कंपनीने बोनस शेअर दिले आहेत. आता ही सहावी वेळ आहे. २९ ऑगस्टच्या बैठकीपूर्वीच कंपनीने बोनस शेअरचं सुतोवाच केलं होतं. आता संचालक मंडळाने त्यालक शिक्कामोर्तब केलं आहे.

(हेही वाचा – सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज व्हावे; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांचे महत्वाचे वक्तव्य)

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी शेअर वाजवी दरात उपलब्ध व्हावेत यासाठी कंपनी बोनस शेअर देऊ करते. म्हणजेच बोनस शेअर दिल्यावर शेअरची किंमतही कमी होते. गुंतवणूकदारांसाठी तो शेअर (Reliance Bonus Share) आकर्षक किमतीला मिळू शकतो. २०२४ मध्ये रिलायन्स कंपनीच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांची वाढ होऊन तो ३,००० रुपयांवर गेला आहे. अशावेळी बोनस शेअरमुळे या किमती थोड्याफार आटोक्यात येऊन नवीन गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळू शकेल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने २९ ऑगस्ट रोजी आपल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ एआय क्लाउड वेलकम ऑफरची घोषणा केली होती. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, यामध्ये जिओच्या ग्राहकांना १०० जीबीपर्यंत मोफत क्लाऊड स्टोरेज मिळणार आहे.

(हेही वाचा – OBC Caste Certificate : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत)

  • रिलायन्समध्ये नोकऱ्या वाढणार : रिलायन्सने नवीन प्रोत्साहनपर रोजगार प्रणाली स्वीकारली आहे. कंपनीने गेल्या वर्षी १७ लाख नोकऱ्या दिल्या. मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने संशोधन आणि विकासावर ३,६४३ कोटींहून अधिक खर्च केला आहे.
  • महसूल १ लाख कोटींच्या पुढे : जिओ ही सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल कंपनी राहिली आहे. त्याचा महसूल १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. कंपनीने देशभरात आपली ५जी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे देशभर वेगवान इंटरनेट सेवा सुरू झाल्याचा कंपनीचा दावा आहे
  • जिओ फोन कॉल एआय लाँच : रिलायन्स जिओने जिओ फोनकॉल एआय ही नवीन सेवा सुरू केली आहे. यामुळे जिओचे ग्राहक फोनवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काही फिचर्स आता वापरू शकतील.

(हेही वाचा – मिठागर विभागाच्या जमिनी Mira-Bhayandar Municipal Corporation ला हस्तांतरित करण्यासाठी केंद्र शासनाने उचलली पावले)

एक महिन्यापूर्वी, रिलायन्स इंडस्ट्रीजने एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीला १५,१३८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वार्षिक आधारावर नफ्यात ५.४५% घट झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत नफा १६,०११ कोटी रुपये होता.

त्याचवेळी एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २,३६,२१७ कोटी रुपये होते. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने २,१०,८३१ कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच वार्षिक आधारावर १२.०४% ची वाढ नोंदवली आहे. (Reliance Bonus Share)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.