Jio चा ग्राहकांना दणका! ‘या’ ऑफरवाले सर्व प्लॅन्स केले बंद! काय आहे कारण?

तुम्ही जिओचे ग्राहक आहात… तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जिओने काही दिवसांपूर्वी Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शनसह सर्व प्लॅन काढून टाकले होते. प्रीपेड आणि पोस्टपेड पोर्टफोलिओमध्ये Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह येणारे सर्वच प्लॅन्स कंपनीने काढले होते. परंतु असे दोन प्लॅन्स होते, ज्यामध्ये याचे प्रीमिअम सबस्क्रिप्शनही मिळत होते.

जिओने आता आपल्या पोर्टफोलिओमधून हे सर्व प्लॅन्स काढून टाकले आहेत. म्हणजेच, Jio युजर्सना यापुढे Disney+ Hotstar चे कोणतेही रिचार्ज प्लॅनचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. कंपनीने Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध असलेल्या दोन्ही प्लॅन्स देखील काढून टाकल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – एलॉन मस्कला ‘त्या’ निर्णयाचा होतोय पश्चाताप! ट्विट करून म्हटले…)

प्लॅन्स बंद करण्याचे काय आहे कारण

जर ग्राहकांना Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह रिचार्ज प्लॅन हवा असेल तर त्यासाठी ग्राहकांना एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाच्या प्लॅन्सकडे वळावे लागणार आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी असे आपल्या इन हाऊस अॅप्समुळे करत असल्याचे समोर आले आहे. जिओ मोठ्या प्रमाणात आपल्या कॉन्टेन्ट प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करत आहे. यासाठी कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅन्ससह यांचे सबस्क्रिप्शन देत नसल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. तर सध्या ग्राहकांना जिओच्या रिचार्जसह जिओ अॅप्लिकेशनचे कॉम्पिमेंट्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

जिओने कोणते प्लॅन केले बंद

सध्या कंपनी कोणतेही OTT सबस्क्रिप्शन असलेला प्लॅन ऑफर करत नाही. पण लवकरच जिओ आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये नवीन OTT प्लॅटफॉर्म जोडू शकते. Viacom 18 कडे पुढील पाच वर्षांसाठी IPL स्ट्रीमिंगचे अधिकार आहेत, याचा संपूर्ण मालकी हक्क हा RIL कडे आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधून 1499 आणि 4199 रूपयांचे दोन रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. दोन्ही प्लॅन्ससह, ग्राहकांना Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन कंपनीकडून मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here