Reliance New IPO : रिलायन्सचा नवीन आयपीओ याच वर्षी येणार बाजारात

Reliance New IPO : कंपनीने दूरसंचार उद्योगातील कंपनीसाठी आयपीओ आणण्याची तयारी चालवली आहे.

60
Reliance New IPO : रिलायन्सचा नवीन आयपीओ याच वर्षी येणार बाजारात
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स कंपनीने यावर्षी नवीन आयपीओ बाजारात आणायचं ठरवलं आहे आणि सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, जिओ टेलिकॉम कंपनीचा हा आयपीओ ३५ ते ४० हजार कोटींचा असू शकतो. यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत हा आयपीओ बाजारात येऊ शकतो. वरील आकडा खरा निघाल्यास भारतीय शेअर बाजारातील हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आयपीओ असेल. आयपीओची प्राथमिक तयारी कंपनीने सुरूही केली आहे. (Reliance New IPO)

आत्तापर्यंत देशातील सर्वात मोठा आयपीए ह्युंदाई मोटार इंडियाचा आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २७,८७० कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च केला होता. यापूर्वी, हे यश भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नावावर होते, त्यांनी २०२२ मध्ये २१,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. (Reliance New IPO)

(हेही वाचा – Bijapur मध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; ९ जवान हुतात्मा)

रिलायन्स समुहाने ५ वर्षात टेलिकॉम, इंटरनेट आणि डिजिटल व्यवसायांसाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. ऑक्टोबर अखेरीस ४७ कोटी वायरलेस ग्राहकांसह रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये दरवाढीमुळे सप्टेंबर तिमाहीत त्याच्या नफ्यात वाढ झाली होती. (Reliance New IPO)

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत, रिलायन्स जिओचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर १४% ने वाढून ६,२३१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ५,४४५ कोटी रुपये होते. त्याच वेळी, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर ७% वाढून २८,३३८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये तो २६,४७८ कोटी रुपये होता. (Reliance New IPO)

(हेही वाचा – Baba Siddique Murder Case : ४५९० पानांचे दोषारोप पत्र; दहशत निर्माण करण्यासाठी बिश्नोई टोळीकडून हत्या)

जिओचा ईबिटा या तिमाहीत वार्षिक ८% वाढून रु. १५,०३६ कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते १३,९२० कोटी रुपये होते. तर मार्जिन ५३.१% होते. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल टेलिकॉम कंपन्यांची कामगिरी मोजण्यासाठी वापरला जातो. जुलैमध्ये रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर कंपनीचा एआरपीयु १९५.१० रुपयांपर्यंत वाढला आहे. (Reliance New IPO)

याआधी, सलग तीन वेळा यात कोणताही बदल झाला नाही आणि तो १८१.७ रुपयांवर स्थिर होता. कंपनीने मागील महिन्यात १४ ऑक्टोबर रोजी आपल्या तिमाही निकालात ही आकडेवारी दिली होती. यापूर्वी, रिलायन्सचा फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने २०२३ साली शेअर बाजारात पदार्पण केलं आहे. या शेअरने गेल्या एका वर्षांत ६८ टक्के इतका परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. (Reliance New IPO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.