- ऋजुता लुकतुके
रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries) वायकॉम १८ (Viacom 18) समुह आता देशातील सगळ्यात मोठा मीडिया समुह असेल. (Reliance-Star Deal)
रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि वॉल्ट डिस्नी ही अमेरिकन कंपनी यांच्यातील विलिनीकरणाची बोलणी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रिलायन्सची वायकॉम १८ (Viacom 18) ही मीडिया उपकंपनी देशातील सगळ्यात मोठी मीडिया कंपनी बनेल. एका करारानुसार, रिलायन्स कंपनीने वॉल्ट डिस्नी कंपनीचा भारतात तयार झालेला सर्व कॉन्टेन्ट विकत घेतला आहे. दुसऱ्या शब्दांत, डिस्नी कंपनी भारतातील आपला बिझिनेस रिलायन्समध्ये विलीन करणार आहे. (Reliance-Star Deal)
स्टार इंडियामध्ये रिलायन्सला मिळणार ५१ टक्के हिस्सेदारी
रिलायन्सला डिस्नीची भारतातील कंपनी स्टार इंडियामध्ये (Star India) ५१ टक्के हिस्सेदारी या व्यवहारानंतर मिळणार आहे. उर्वरित ४९ टक्के वॉल्ट डिस्नेकडे असतील. समभागांच्या स्वॉपिंगमधून हा करार प्रत्यक्षात येणार आहे. (Reliance-Star Deal)
दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर जी नवीन कंपनी तयार होईल तिला नवनिर्मितीसाठी भांडवल लागणार आहे. ते कुणी आणि किती द्यायचं यावरही बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. साधारण एक ते दीड अब्ज अमेरिकन डॉलर इतकं भांडवल दोन्ही कंपन्या उभं करणार आहेत. त्यामुळे समभागांची हिस्सेदारी आणि नवीन उभं राहणारं भांडवल यातून नवीन कंपनीचं मूल्यांकन ठरेल. (Reliance-Star Deal)
(हेही वाचा – WFI Election : कुस्ती फेडरेशनची निवडणूक संजय सिंग यांनी लढू नये म्हणून बजरंग, साक्षी यांचं क्रीडामंत्र्यांना साकडं )
‘इतक्या’ वाहिन्या येतील एकत्र
दोन्ही कंपन्या एकत्र आल्यानंतर समुहात स्टार इंडियाच्या ७७ आणि वायकॉम १८ च्या ३८ वाहिन्या एकत्र येतील. डिस्नी-हॉटस्टार (Disney-Hotstar) आणि जिओ सिनेमा (Jio Cinemas) असे दोन ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) असतील आणि या दोन कंपन्यांकडे मिळून २ लाख तासांचा लायब्ररी कॉन्टेन्ट आहे. (Reliance-Star Deal)
सध्या दोन कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहेत आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात विलिनीकरण जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता आहे. (Reliance-Star Deal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community