पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Pune Airport) नवीन टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेला सहा महिन्यांनंतर मुहूर्त लागला आहे. ८ फेब्रुवारीपासून सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हवाई प्रवाशांना दिलासा मिळणार असून, प्रवासापूर्वी तपासणीसाठी (चेक इन) लागणारा कालावधी कमी होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या सेवेला सुरुवात केली जाणार आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी सावरकर स्मारकातील लाईट अँड साउंड शो पाहून झाले प्रभावित)
डिजियात्रा सेवा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Pune Airport) जुन्या टर्मिनलवर कार्यान्वित होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मार्च २०२४ रोजी दृकश्राव्य माध्यमातून विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. नव्या टर्मिनलमधून प्रवासी वाहतूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात १४ जुलै २०२४ पासून प्रवासी वाहतूक सुरू झाली. या टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेची परवानगी आणि तांत्रिक बाबींमध्ये प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे जुन्याच टर्मिनलवरून प्रवाशांच्या बोर्डिंगची तपासणी करून प्रवेश दिला जात होता. परिणामी, प्रवाशांची गर्दी होऊन विमानतळावर रांगेत थांबावे लागत होते. प्रवाशांना विलंब होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community