पासपोर्टसाठी पोलीस ठाणे, पासपोर्ट कार्यालयात (Passport office) खेटे घालून देखील महिनोमहिने पासपोर्ट मिळत नसल्यामुळे अनेकांना परदेशवाऱ्या रद्द कराव्या लागतात, मात्र यापुढे असं होणार नाही, १५ दिवसात पासपोर्ट घरपोच करण्यात येईल अशी तरतूद प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. पासपोर्ट अर्जदाराच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही समस्या नसल्यास, पोलिसांनी केवळ सात दिवसांत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच १५ दिवसांच्या आत त्यांचे पासपोर्ट (Passport) मिळतील असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
(हेही वाचा – मुंबईतील Cement Concreting रस्त्यांच्या कामांना गती; ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे विधानसभाध्यक्षांचे निर्देश)
पासपोर्ट (Passport) काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असली तरी अनेकाना पासपोर्ट (Passport) मिळविण्यासाठी दोन दोन महिने थांबावे लागते. मुख्यतः पोलीस पडताळणीच्या वेळी पासपोर्ट (Passport) काढणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, जो पर्यत पोलीस पडताळणी (Police Verification) होत नाही, तोपर्यत पासपोर्ट (Passport) मिळू शकत नसल्यामुळे पासपोर्ट कार्यालयाला देखील पोलीस पडताळणी (Police Verification) साठी थांबावे लागते. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतानाही पोलीसांकडून व्हेरिफिकेशन तात्काळ होत नसल्याच्या तक्रारी अनेकांकडून येत असतात, पोलिसांना चिरीमिरी दिल्यावर पटकन काम होते असा आरोप अनेकांकडून करण्यात येतो.
मात्र यापुढे केवळ १५ दिवसात पासपोर्ट (Passport) घरपोच करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या परिवर्तन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मुंबईतील (Mumbai) सर्व ९१ पोलिस ठाण्यांना (Police Station) त्यांच्या पासपोर्ट (Passport) पडताळणी प्रक्रियेत सुधारणा केली जात आहे, त्यासाठी सात दिवसांत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे, यापुढे पासपोर्ट पडताळणी जलद आणि अधिक कार्यक्षम होईल. सर्व पोलिस ठाण्यांना पासपोर्ट पडताळणी युनिट्सचे नूतनीकरण करण्याचे आणि ही प्रक्रिया नागरिकांसाठी अनुकूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community