कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे अनेक नागरिकांना वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने विशेष योजना सुरू केली. बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या महावितरणच्या या योजनेचा पुणे विभागातील 3,886 ग्राहकांना लाभ झाला. या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तर राज्यातील 43 हजार 345 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
( हेही वाचा : मालिका जिंकल्यावर विराट-ईशान थिरकले; डान्सचा व्हिडिओ व्हायरल! )
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक वीज ग्राहकांना वेळेत बिले भरता आली नव्हती. त्यांच्या बिलाची थकबाकी होती. बिलाच्या मूळ रकमेवर व्याज जमा झाले होते. शिवाय दंडात्मक रक्कमही भरणे गरजेचे होते. यामुळे थकित रक्कम अधिक वाढली होती. थकित बिलामुळे वीज कनेक्शन तोडले गेले होते. अशा ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा सुरू व्हावा म्हणून महावितरणने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ लागू केली होती. त्यानुसार संबंधित ग्राहकांनी बिलाची मूळ रक्कम भरली तर त्यांना बिलाच्या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमध्ये प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजबिलांची मूळ रक्कम भरून पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.
Join Our WhatsApp Community