पंजाबमधील (Punjab) शीखांचे ख्रिस्ती धर्मांत धर्मांतर हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षात वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये ख्रिस्ती धर्मांतर (Christian conversion) मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वेळा शीख संघटनांनी धर्मांतरासंदर्भात चिंता व्यक्त केली. तरीदेखील काँग्रेस (Congress) सरकारने किंवा आप सरकारने या मुद्द्यावर लक्ष दिलेन नाही.
(हेही वाचा : Saif Ali Khan : गुन्हेगारीला धर्माशी जोडणे हे गैर आहे; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य)
दरम्यान दैनिक जागरणने दिलेल्या अहवालानुसार, पंजाबमध्ये (Punjab) गेल्या २ वर्षात ३ लाख ५० हजार लोकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यात आले आहे. माहितीनुसार, पंजाबमध्ये २०२३-२४ या वर्षात १. ५ लाख लोकांनी धर्मांतर केले असून २०२४-२०२५ च्या शेवटापर्यंत २ लाख लोकांनी धर्मांतर केले आहे.
राज्यनिहाय धर्मांतरितांची वाढती संख्या पाहिली तर आणखी आश्चर्याचा धक्का बसेल. तरणतारनमधील अहवालानुसार, गेल्या १० वर्षांत येथील ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या ६,१३७ वरून १२,४३६ झाली आहे, म्हणजेच दहा वर्षांत १०२ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, जर आपण गुरुदासपूर जिल्ह्याबद्दल बोललो तर, गेल्या ५ वर्षांत ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या ४ लाखांहून अधिक वाढली आहे.
पंजाबमध्ये ख्रिस्ती पाद्री करतात शिखांना लक्ष्य
जरी ख्रिस्ती मिशनरी देशभरातील दुर्गम भागात पोहोचून गरीब आणि असहाय्य लोकांना लक्ष्य करत असले तरी, पंजाब हा अधिक चिंतेचा विषय आहे कारण येथे धर्मांतराचा त्यांचा खेळ उघडपणे सुरू आहे. येथे रुग्णांच्या प्रार्थना सभा उघडपणे घेतल्या जातात. मृत व्यक्तीला जीवनदान देण्याचा दावा करणारे पाद्री हे कार्यक्रम आयोजित करतात. यानंतर, गोंधळ निर्माण करून, शिखांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगितले जाते. (Punjab)
पंजाबमध्ये धर्मांतरासाठी परदेशी निधी
पंजाबमध्ये सुरू असलेल्या धर्मांतराच्या कटाला परकीय निधी मिळत असल्याचे लक्षात येते. त्यात दैनिक जागरणने शीख स्कॉलर डॉ. रणबीर सिंग (Dr. Ranbir Singh) यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये (Punjab) सुरू असलेल्या धर्मांतराच्या कटाला अमेरिका, पाकिस्तान आणि इतर देशांकडून निधी दिला जात आहे. (Punjab)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community