ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार

70
ST Bus चा ठावठिकाणा आता मोबाईलवर; येत्या महिन्यात सुरू होणार ॲप

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. (ST Employee Salary)

(हेही वाचा – Lovelina Borgohain : लवलिना बोरगोहेनला बदलायचाय आपला वजनी गट)

एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज सांगोला (Sangola) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे. (ST Employee Salary)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.