Remal Cyclone: ‘रेमल’ चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार, महाराष्ट्रालाही धोका?

473
Remal Cyclone: 'रेमल' चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार, महाराष्ट्रालाही धोका?
Remal Cyclone: 'रेमल' चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार, महाराष्ट्रालाही धोका?

बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) ‘रेमल’ या चक्रीवादळाची (Remal Cyclone) निर्मिती झाली आहे. रविवारी (२६ मे) हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 इतका राहू शकतो. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये (Odisha) एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर, अतिरिक्त पाच तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मान्सूनवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Remal Cyclone)

(हेही वाचा –Sion Hospital : डॉ. डेरेवर गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब का झाला? पोलिसांनी सांगितले कारण..)

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या ‘रेमाल’ चक्रीवादळचं केंद्र खेपुपारापासून सुमारे 360 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर बेटाच्या 350 किमी दक्षिण-पूर्वेस आहे. आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळाची (Remal Cyclone) तीव्रता आणखी तीव्र होऊन रविवारी सकाळपर्यंत त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. (Remal Cyclone)

(हेही वाचा –IT Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाची धाड! बंगल्यातील फर्निचर फोडून काढल्या नोटा)

IMD च्या मते, रविवारी मध्यरात्री सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला 110 ते 120 किमी प्रतितास वेगानं वाऱ्याचा वेग ओलांडण्याची अपेक्षा आहे. 26-27 मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 27-28 मे रोजी ईशान्य भारतातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. (Remal Cyclone)

महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा परिणाम होणार ?

उष्णकटिबंधीय भागातून तयार होणाऱ्या वादळाच्या प्रकारात मोडत असलेलं हे चक्रीवादळ सर्वात आधी ओमानमध्ये 2024 च्या मान्सून हंगामापूर्वीच दाखल होणार आहे. ओमान देशाच्या हवामानखात्यानं या चक्रीवादळाला ‘रेमल’ असं नाव दिलं आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ‘वाळू’ असा होतो. या चक्रीवादळमुळे (Remal Cyclone) पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये (Cyclone Remal) मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर मात्र, या चक्रीवादळाचा काहीच परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. (Remal Cyclone)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.