धक्कादायक! रेमडेसिवीर इंजेक्शनची बॅच निघाली सदोष! कंपनीने तात्काळ घेतले मागे! 

रायगड जिल्ह्यासाठी २८ एप्रिल रोजी ५०० इंजेक्शनचा साठा पुरवण्यात आला होता. त्यातील १२० इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता.

सध्या राज्यात विविध कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. साठा ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे त्याचे जिल्ह्यानिहाय वितरण होत आहे. त्याप्रमाणे कोविफॉर कंपनीचाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा वितरित करण्यात आला, मात्र काही तासांतच कंपनीने हा साठा परत मागवून घेतला आहे.

रायगडमध्ये रेमडेसिवीरचा दुष्परिणाम!

कंपनीने हा साठा सदोष असल्याचे सांगत खबरदारी म्हणून कंपनीने तात्काळ हा साठा परत मागवून घेतला आहे. विशेष म्हणजे या इंजेक्शनचा साठा रायगड जिल्ह्यात पाठवण्यात आला होता. जिल्ह्यासाठी २८ एप्रिल रोजी ५०० इंजेक्शनचा साठा पुरवण्यात आला होता. त्यातील १२० इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता, मात्र त्यातील ९० रुग्नांवर त्याचा दुष्परिणाम झाला असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार करून रुग्णांची तब्येत स्थिर स्थावर करण्यात आली आहे, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या इंजेक्शनचा वापर करण्यास थांबवले आहे.

( हेही वाचा : लसीचा पहिला डोस घेतल्यावर कोरोना झाल्यास कधी घ्याल ‘दुसरा’ डोस? ‘एम्स’च्या तज्ज्ञांनी दिले उत्तर)

अन्न आणि औषध प्रशासनाकडून चौकशी!

अन्न आणि औषध प्रशासनाने हे इंजेक्शन मागे घेतले आहे. महाड येथील डिस्ट्रीब्यूटरतर्फे जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र याचा दुष्परिणाम होत असल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाने कळवताच अन्न आणि औषध प्रशासनाने हे औषध मागे घेतले आहे. दरम्यान हा हे इंजेक्शन का सदोष निघाले याची चौकशी अन्न आणि औषध प्रशासनाने सुरु केली आहे, परंतु याचा अहवाल सध्या तरी प्रशासन जाहीर करणार नाही, कारण यामुळे जनमानसात नाहो संशयाचे पर्यायाने भीतीचे वातावरण निर्माण होईल, असे सूत्रांकडून समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here