2021-22 वर्षाचा इनकम टॅक्स भरण्यासाठी आता शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, 31 जुलै 2022 पर्यंत आता करदात्यांना कर भरावा लागणार आहे. त्यामुळे या तारखेनंतर टॅक्स भरल्यास करदात्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे करदात्यांनी कर भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कर न भरल्यास त्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते.
इतका भरावा लागणार दंड
2021-22 या आर्थिक वर्षासाठी करदात्यांना 31 जुलैपर्यंत आयटीआर भरावा लागणार आहे. या तारखेनंतर आयटीआर भरणा-या कारदात्यांना भरावी लागणारी दंडाची रक्कम ही फार मोठी आहे. 5 लाखांच्यावर असलेल्या रक्कमेवर कर भरणा-या करदात्यांना 31 जुलैनंतर 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. तर 5 लाखांपेक्षा कमी रक्कमेवर कर भरणा-या करदात्यांसाठी दंडाची रक्कम ही एक हजार रुपये इतकी आहे.
(हेही वाचाः Indian Railway Rules: रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या नियमांत मोठे बदल, आता प्रवास होणार अधिक आरामदायी)
यांना भरावा लागणार नाही टॅक्स
60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांना अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणा-या करदात्यांना मात्र कराची योग्य ती रक्कम भरावी लागणर आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारे नागरिकही रिटर्न फाईल करू शकतात. अशा करदात्यांनी 31 जुलैनंतर कर भरला तरी त्यांना कोणताही दंड भरावा लागणार नाही.
Join Our WhatsApp Community