अलिकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक लोक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास पसंती देतात. परंतु देशात इलेक्ट्रिक वाहने ही संकल्पना काही नवखी असल्याने अनेकांना याबद्दल फारशी नाही त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिक वाहन, स्कूटर खरेदी करणार असाल, तर या टिप्स नक्की फॉलो करा…
बॅटरी, चार्जिंग क्षमतेबद्दल पुरेशी माहिती घ्या
- फुल चार्जिंग केल्यावर तुमची इलेक्ट्रिक स्कूटर किंवा गाडी किती अंतर प्रवास करते याचा अंदाज घ्या. सध्या बाजारात ६० ते १२० किलोमीटर रेंज देणाऱ्या स्कूटर उपलब्ध आहेत.
- इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. ही बॅटरी वीजेवर चालते. गाडीची बॅटरी वॉटरप्रुफ, शॉकप्रुफ, बॅटरी रिप्लेस होते का हे एकदा तपासून पहा तसेच बॅटरीची क्षमता, व्हॅट याबद्दल पुरेशी माहिती घ्या.
- पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बिघडल्या तर थेट मॅकेनिकडे घेऊन जाऊ शकतो परंतु इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बिघाड झाल्यास आपल्याला कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच गाडीला न्यावे लागते. त्यामुळे गाडी खरेदी करताना कंपनीची सर्व्हिस पॉलिस आणि वॉरंटीची माहिती तपासून घ्या. तसंच कंपनी गाड्यांचे स्पेअर पार्ट बनवते का हे सुद्धा जाणून घ्या.