पदपथावरील जाहिरात फलक हटवा; Anil Galgali यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

202
पदपथावरील जाहिरात फलक हटवा; Anil Galgali यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
पदपथावरील जाहिरात फलक हटवा; Anil Galgali यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

आपण सर्व घाटकोपर पूर्व येथील एका चुकीच्या जाहिरात फलकामुळे आजही दुःखात आहोत. अश्या चुका मुंबईतील विशेषतः पदपथावर आजही प्रत्यक्षात दिसत आहे. यामुळे भविष्यात येथेही अश्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी पदपथावरील जाहिरात फलक निष्कासित करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

(हेही वाचा- Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमानाचा टेक ऑफ करताना भीषण अपघात; १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी (Ashwini Joshi), एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) आणि पालिका उपायुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांस पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की मुंबईतील पालिका आणि एमएमआरडीएच्या अख्यतारीत असलेल्या पदपथावर आज 50 हून अधिक असे जाहिरात फलक ठळकपणे दिसून येत आहेत. यात मुंबई पालिका, एमएमआरडीए अश्या संस्थांनी परवानगी दिल्या आहेत. मुंबईत वातावरण बदल होत असतात आणि तासी हवेचा वेग अधिक होत असतो. अश्यावेळी हे फलक टिकाऊ नाहीत. पदपथावर नागरिकांना चालण्यासाठी असावा पण दुर्दैवाने अश्या पदपथावर मोठ मोठे जाहिरात फलक केव्हाही कोसळू शकतात. (Anil Galgali)

अनिल गलगली (Anil Galgali) यांची मागणी आहे की सद्यस्थितीत अग्रक्रमाने पालिका आणि एमएमआरडीएचे पदपथ जाहिरात फलक मुक्त करत निष्कासित करावे. नवीन जाहिरात धोरणात पदपथावर जाहिरात फलक लावण्याची तरतूद रद्दबातल करण्यात यावी, असे मत गलगली यांचे आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.