गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही, पुणे महापालिकेचे आदेश

162

गणेशोत्सव संपून पाच दिवस उलटले तरी, रस्त्यांवरील गणेश मंडप, विसर्जन रथ, रनिंग मांडव हटविण्यात आलेले नाहीत. ते आजच्या आजच हटविण्यात यावेत, असे आदेश पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गणेशमंडळांना दिले आहेत. शहरातील जी गणेश मंडळे कार्यवाही करणार नाहीत व रस्ते, पादचारी मार्ग तातडीने मोकळे करणार नाहीत, त्यांना पुढील वर्षी गणेशोत्सवास परवानी देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयांनी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी आदेशात नमूद केले आहे.

( हेही वाचा : दार्जिंलिंगचे प्राणिसंग्रहालय देशात सर्वोत्कृष्ट)

पुणे महापालिकेचे आदेश

कोरोना आपत्तीमुळे दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव पार पडला असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने तसेच पोलिसांनाही मंडळांकडून आकारले जाणारे परवाना शुल्क माफ केले आहे. याचबरोबर गणेश मंडळांना २०२७ पर्यंत पाच वर्षाचा एकत्रित परवाना देण्यात आला आहे. गणेशोत्सव संपून पाच दिवस झाले तरीही अनेक मंडळांचे मांडव, देखाव्यांचे साहित्य, सांगाडे, रथ, कमानी रस्त्यावर आणि पदपथांवर पडून आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.