-
ऋजुता लुकतुके
रेनॉ कंपनीची अरकाना ही कुप एसयुव्ही गाडी डिसेंबर लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे. पण, तिची किंमत ऐकाल तुमची बोटं तोंडात जातील. (Renault Arkana)
डिसेंबर महिन्यात जगभरात न्यू ईयर आणि ख्रिस्मसचं वातावरण असतं आणि त्यामुळे लक्झरी कारसाठी हा सुगीचा हंगाम मानला जातो. म्हणूनच अगदी लँबॉर्गिनी आणि किया कंपन्यांनी आपल्या बहुचर्चित गाड्या बाजारात आणण्यासाठी हाच मूहूर्त निवडला आहे. (Renault Arkana)
त्याचबरोबर रेनॉ कंपनीची कूप एसयुव्ही गाडी अरकानाही डिसेंबरमध्ये लाँच होणार आहे. २०१८ च्या मॉस्को ऑटोएक्स्पोमध्ये रेनॉ कंपनीने सगळ्यात आधी ही कार लोकांसमोर आणली. सी सेगमेंटची ही कार कुप एसयुव्ही प्रकारातील आहे. दोन वर्षांपूर्वीच या गाडीने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केलेला आहे. (Renault Arkana)
त्यानंतर आता चेन्नईच्या रस्त्यांवर ही कार खुलेआम दिसली होती. अर्थात, तेव्हा तिची ट्रायल घेण्याचं काम सुरू होतं. पण, कंपनीने तिची ओळख न लपवताच ही ट्रायल सुरू ठेवली होती. त्यामुळे गाडीचा लुक आणि बाहेरून ती कशी दिसते यावर कारप्रेमी लोकांमध्ये आधीच चर्चा सुरू झाली आहे. (Renault Arkana)
12.07.2023 official reveal: all new #Renault #Arkana #ETech #fullhybrid 145 hp. up to 1000 km range. now available in esprit Alpine trim. sporty design combining fluidity, presence and robustness. redesigned front grille. pic.twitter.com/iHs0LuzfuI
— Renault India (@RenaultIndia) July 12, 2023
एसयुव्हीच्या मानाने या गाडीची उंची काहीशी कमी आहे. पण तो डिझायनिंगचा भाग आहे. रेनॉ कंपनीचा नवा तरुणांना आकर्षित करणारा लोगो या गाडीवरही आहे. आणि मारुती सुझुकी एस-क्रॉस ही गाडी बंद झाल्यामुळे एसयुव्ही क्रॉसओव्हर क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी रेनॉची ही कार भरून काढू शकेल. (Renault Arkana)
या गाडीचं इंजिन १.३ लीटर टीसीईपी प्रकारचं आहे आणि ते रेनॉने मित्सुबिशी आणि निस्सान कंपनीच्या सहकार्याने बनवलं आहे. पॉवर आऊटपुट १४८ बीएचपी इतकं आहे. (Renault Arkana)
(हेही वाचा – Congress : तीन राज्यातील भाजपच्या विजयानंतर मविआतील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर घटली)
इंटिरियर पाहता ही गाडी प्रशस्त आहे आणि ८ इंच मोठा डिजिटल डिस्प्ले लक्ष वेधून घेणारा आहे. गाडीतील मल्टीमीडिया प्रणालीवर अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार चालू शकतात. गाडीला इको, स्पोर्ट्स आणि माय स्पेस असे तीन मोड आहेत. तर ५०८ लीटर्सची बूटस्पेसही आहे. (Renault Arkana)
या गाडीची एक्स शोरुम किंमत २० लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. टाटा हॅरिअर तसंच हुंदे क्रेटा या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल. (Renault Arkana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community