RTO चा नवा नियमः लायसन्समधील ही गोष्ट तपासून घ्या, नाहीतर 5 हजार दंड भरा

ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवणं हा गुन्हा असून त्यासाठी तुम्हाला भरभक्कम दंड देखील आकारला जातो. पण लायसन्स असताना सुद्धा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. नव्या नियमांनुसार जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपली असेल तर तुम्हाला 5 हजार रुपयांच्या दंडाचा भुर्दंड भरावा लागू शकतो.

आरटीओकडून देण्यात येणारे ड्रायव्हिंग लायसन्स हे ठराविक काळासाठी देण्यात येते. त्यामुळे मुदत संपल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे लायसन्स रिन्यू करणं गरजेचं आहे.

लायसन्स रिन्यू करणे गरजेचे

आरटीओ ऑफिसकडून देण्यात येणारे ड्रायव्हिंग लायसन्स हे 20 वर्षांसाठी किंवा वयाच्या 50 वर्षांपर्यंत यापैकी जे आधी येईल ते तोपर्यंत वैध असते. त्यामुळे ही मुदत लक्षात ठेऊन ड्रायव्हिंग लायसन्स वेळीच रिन्यू करणे आवश्यक आहे. आरटीओ ऑफिसला भेट देऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील आपल्याला वाहनाचे लायसन्स रिन्यू करता येते.

(हेही वाचाः Asia Cup 2022: आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार भारत-पाकिस्तान सामना)

परिवहन मंत्रालयातर्फे परिवहन सेवा हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर जाऊन आपल्याला आपले ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे सहज शक्य आहे. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे-

  • परिवहन सेवा पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करा
  • ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा पर्याय निवडा
  • त्यानंतर आपलं राज्य निवडा
  • अप्लाय फॉर रिन्यूअल हा पर्याय निवडा
  • तुमचा लायसन्स नंबर,जन्म तारीख आणि कॅप्चा कोड एंटर करुन सबमिट करा
  • त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा आणि शुल्क भरा
  • त्यानंतर मिळणारी पावती जपून ठेवा, हा तुमच्या लायसन्स रिन्यूअलचा पुरावा असेल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here