प्रसिद्ध किर्तनकार आणि व्याख्यात्या डॉ. रश्मी घोलप यांचे Maharashtra Military School मध्ये व्याख्यान संपन्न

207

मुरबाड (Murbad) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये ०४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध किर्तनकार आणि व्याख्यात्या डॉ. रश्मी भरत घोलप यांचे “शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा, पालक आणि शिक्षकांची जबाबदारी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दुपारी तीन ते चार या वेळेत आयोजित करण्यात आले होते. किर्तनकार डॉ. रश्मी भरत घोलप (Kirtankar and Lecturer Dr. Rashmi Gholap) यांचा प्राचार्य काशिनाथ भोईर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे “1857 चे स्वातंत्र्य समर” हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. (Maharashtra Military School)

(हेही वाचा – Mumbai मधील विकासकामांना गती मिळणार; सहा पुलांची कामे तीन महिन्यांत मार्गी लागणार)

मिळलेल्या माहितीनुसार, शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर (Principal Kashinath Bhoir) यांनी प्रास्ताविकात व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट करून डॉ. रश्मी भरत घोलप यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. याबाबतीत पालक आणि शिक्षकांनी सजग होणे गरजेचे आहे. यावेळी शासननिर्णय 21 ऑगस्ट 2024 चा संदर्भ देऊन, शासन स्तरावर याविषयी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. शाळा, त्या नुसार कार्यवाही करत आहे. सर्व बाबतीत मुलांच्या सुरक्षेसाठी काळजी घेत आहे. याबाबतीत पालकांना सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी या व्याख्यानातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि पालकांना संबोधित करतांना डॉ. रश्मी घोलप यांनी शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व पालकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. तसेच इथे प्रवेश घेतलेला विद्यार्थी हा अत्यंत भाग्यवान आहे. कारण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, सर्वांगिण विकासासाठी आवश्यक पोषक वातावरण या शाळेत उपलब्ध आहे. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. रश्मी घोलप पूढे म्हणाल्या की मात्र पालकांनी आपल्या पाल्याला या शाळेत प्रवेश घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होऊ देता कामा नये. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक असा त्रिकोण तयार होतो, आणि हे तीन त्रिकोणाचे बिंदू एकमेकांवर अवलंबून आणि जोडलेले असतात त्या प्रमाणे एकत्व भावनेने काम केले म्हणजे विद्यार्थी विकासाला चालणा मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Accident News : वाहनांची सामोरासमोर धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू, नऊ जण जखमी)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत डॉ. रश्मी घोलप यांनी सांगितले की यामध्ये पालक, शिक्षक (Teacher) आणि शाळा (School) व्यवस्थापनाची जबाबदारी खूप मोठी आहे. या करिता शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे गरजेचे आहे. तसेच, शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत समुपदेशन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना संबंधित करताना त्यांनी अनेक उदाहरणांसह काही मुद्दे स्पष्ट केले. हे मार्गदर्शन पर व्याख्यान ऐकतांना शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा प्रतिसाद उत्तम होता. यावेळी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद देसले यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.