मुंबईची निंदा का करता? अमृता फडणवीस यांच्या ट्विटला रेणुका शहाणेंचे उत्तर

सुशांतसिह राजपूत यांच्या दुःखद मृत्यूचे राजकारण करू नका आणि मुंबईची निंदा करण्यासाठी या प्रकरणाचा वापर करू नका अशा शब्दात प्रसिध्द अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा समाचार घेतला. त्या मिसेस मुख्यमंत्री असत्या तर असे वक्तव्य केले नसते अशा शब्दात रेणुका शहाणे यांनी चपराक दिली. मिसेस मुख्यमंत्री हे बिरुद गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अमृता फडणवीस ट्विटच्या माध्यमातून सतत त्रागा व्यक्त करीत असतात. अभिनेता सुशांतसिह राजपूतचा आत्महत्येचा संबंध मुंबईच्या सुरक्षिततेशी जोडत त्यांनी व्टिट केले होते.

काय म्हणाल्या रेणुका शहाणे      

सुशांतच्या दुर्देवी मृत्युचे राजकारण करू नका, या घटनेचा वापर विनाकारण मुंबई व मुंबईकरांची निंदा करू नका. त्याऐवजी तुमच्याकडे खरेच काही खात्रीशीर माहिती असेल तर मुंबई पोलिसांना देऊन त्यांना तपासकामात मदत करा. तेवेढे अधिकार तुम्हाला आहेत असे ट्विट रेणूका शहाणे यांनी केले आहे. तसेच अमृता फडणवीस यांची बाजू घेऊन ट्रोल करणा-यांनाही रेणुका शहाणे यांनी चांगलेच झापले आहे. अमृता या मिसेस मुख्यमंत्री असत्या तर मुंबईबदद्ल त्यांनी कोणत्याही परिस्थितीत असे वक्तव्य केले नसते याकडे ट्रोलर्सचे त्यांनी लक्ष वेधले. एल्फिन्स्टन पूल देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोसळला होता. त्यात अनेक मुंबईकरांचे जीव गेले होते. तेव्हा मुंबई असुरक्षित किंवा संवेदनाहीन असल्याचे अमृता कधी म्हणाल्या नव्हत्या याची आठवणही रेणुका शहाणे यांनी करून दिली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here