मुंबईतील विविध पुलांची किरकोळ सतेच मोठ्या स्वरुपातील डागडुजींचे काम महापालिकेने हाती घेतले असून अंधेरी पश्चिम, मालाड आणि गोरेगाव आदी भागांमधील सुमारे ५० उड्डाणपूल, पादचारी पूल तसेच स्कायवॉकची दुरुस्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे रात्रीच्या वेळेत सुरु असून मुंबईच्या उत्तर दिशेला राहणाऱ्या म्हणजे विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, दहिसर, बोरीवली, कांदिवली आदी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जर सकाळच्या रात्री उशिरा किंवा पहाटे विमानाने प्रवास करायचा असेल तर या सर्व पुलांची सुरु असलेली कामे लक्षात घेता त्यांनी दोन तास आधी नियोजन करूनच बाहेर पडण्याची गरज आहे. (BMC)
मुंबईतील सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून पश्चिम उपनगरातील सर्वेक्षणासाठी नेमलेल्या एसजीएस कन्सल्टींग सर्विसेस यांनी दिलेल्या अहवानुसार मालाड, गोरेगाव आणि विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी पश्चिम आदी भागातील विद्यमान पुलांची मोठी आणि किरकोळ स्वरुपाची कामे केली जात आहेत. या कामांसाठी महापालिकेने सी ई इन्फ्रा इंडिया या कंपनीची निवड केली असून यासर्व पुलांच्या डागडुजीवर विविध करांसह तब्बल ४१ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Chunabhatti Firing : वर्चस्वाच्या लढाईतुन सुमित येरुणकरची हत्या)
खालील पुलांच्या डागडुजीची कामे हाती घेण्यात आली आहेत
गोरेगाव
१) चिचोली फाटक एफओबीआरएल, २) चुरलीवाली पूल, ३) जीएमएलआर-पादचारी पूल, ४) गोगटेवाडी-पूल, ५) गोरेगाव दक्षिण-आकाशमार्गिका, ६) गोरेगाव दक्षिण-एफओबीआरएल, (७) गोरेगाव सबवे, ८) जवाहर नगर-एफओबी आरएल, ९) मृणालताई गोरे-आरओबी, १०) एमटीएनएल-उड्डाणपूल, ११) विभोर शाळा-पूल, १२) ओशीवारा नाला (एस व्ही रोड), १३) पिरामल नाला (इनॉर्बिट मॉल), १४) पिरामल नाला (पिरामल नगर), १५) सेंन्ट थॉमस नाला-पूल, १६) वीर सावरकर-उड्डाणपूल, १७) वालभट नाला (सोनावाला लेन), १८) वालभट नाला (आयबी पटेल लेन)-पूल, १९) वालभट नाला (महानगर गॅस)-पूल, २०) वालभट नाला (फिल्मसिटी रोड)-पूल,२१) वालभट नाला (कृष्णा वाटिका)-पूल. (BMC)
विलेपाले, अंधेरी आणि जोगेश्वरी पश्चिम परिसर
१)अंधेरी सबवे (के/पश्चिम वार्ड च्या समोर), २) बाळासाहेब ठाकरे आरओबी, ३) बर्फिवाला आरओबी, ४) सेलिब्रेशन स्पोटर्स क्लब-पूल, ५) इर्ला नाला-पूल ६) कामत क्लब-पूल, (७) मिलत नगर-पूल, ८) महाराष्ट्र बँकेच्या जवळ-पूल, ९) ओशिवरा पूल (लिंक रोड)-पूल, १०) प्रमोद नवलकर मार्ग-पूल,११) तनिष्क उत्तरेकडील बाजूचे पूल-, १२) विलेपार्ले स्कायवॉक, १३) एमएमआरडीए पूल. (BMC)
मालाड परिसर
१) आथर्व महाविद्यालय पूल, २) गोकूळ नगर आणि आनंद नगर यांना जोडणारा पादचारी, पूल, ३) दादा दादी पार्क पूल, ४) धारिवली कल्व्हर्ट, ५) क्रांतीनगर पूल, ६) लालजीपाडा (वलनाई) पूल, ७) लिबर्टी गार्डन पूल, ८) लव्ह पाईन्ट पूल, ९) मढ नाला पूल, १०) मालाड उत्तर एफओबीएल, ११) मलाड सबवे व्ही. एस., १२) मिठीचौकी पूल, १३) रामचंद्र लेन नाला पूल, १४) राणीसती पूल एफओबीआरएल, १५) शिवाजीनगर (अप्पापाडा) पूल, १६) शिवाजी नगर (मॅपल हाइट) पूल. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community