- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुलुंड कालिदास नाट्यगृह संकुलातील जलतरण तलावाची (Mulund Swimming Pool) दुरूस्ती आणि फिल्टरेशन प्लांटचे नुतनीकरण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. या जलतरण तलावातील पाण्याची गळती तसेच फ्लोरिंगच्या फरशा आणि फिल्टरेशन प्लांटचे नुतनीकरण तसेच तलावाची पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीनी नव्याने बसवण्याचे काम आदी कामे हाती घेण्यात येणार आहे. कालिदास क्रिडा आणि नाट्यगृह संकुल येथील जलतरण तलावांशी संबंधित सर्व सुविधांसह विद्यमान जलतरण तलावांची तपासणी तथा देखभाल करण्यासाठी आणि जलतरण तलावांचे नुतनीकरण प्राधान्याने करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त मेसर्स शशांक मेहेंदळे आणि असोसिएट्स यांनी येथील कामासाठी आवश्यक दुरुस्ती कामांस प्राधान्य देण्याचे सुचवले.
(हेही वाचा – Pune Airport : पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव)
त्यानुसार, संरचना इमारत. बॅलेसिंग टैंक (समतोल टाकी), आर. सी. सी. डायविंग बोर्डची आवश्यकतेनुसार संरचनात्मक दुरुस्ती करणे, जलतरण तलाव, डायविंग तलाव, ओव्हरफ्लो चॅनेल व बॅलेसिंग टँक (समतोल टाकी) यांची गळती रोखणे, आवश्यकतेनुसार जलतरण तलाव, डायविंग तलाव, ओव्हरफ्लो चॅनेल, कपडे बदलण्याची खोली व स्वच्छतागृहात डॅडो आणि फ्लोअरिंगच्या फरश्या बदलणे, व्हिविंग गॅलरीचा विस्तार करून सांध्यांची दुरुस्ती व अॅटीफंगल सेल्फ लेव्हलिंगची प्रणाली प्रदान करणे, आवश्यकतेनुसार अंतर्गत आणि बाह्य गिलाव्याची कामे करणे. कंपाऊंड भिंतीची दुरुस्ती व पुर्नबांधणी, अंतर्गत आणि बाहय रंगकाम करणे. फील्टरेशन प्लांट ते जलतरण तलावाची पाणीपुरवठा लाइन, जीआरपी पाईप लाईन बदलणे. संपूर्ण प्लंबिंग लाईन, ड्रेन लाईन तसेच भूमिगत ड्रेनेज लाईन बदलणे व इतर प्लंबिंगची कामे करणे. किटकनाशक उपचार करणे. (Mulund Swimming Pool)
(हेही वाचा – Jammu-Kashmir Assembly Election : भाजपाचे जम्मू-काश्मीरसाठी ‘मिशन ६६’)
येथील लॉबी, पुरुष व महिलांची कपडे बदलण्याची खोलीमधील वायरिंग, ट्युबलाइटस, एलईडी फ्लाड लाइट्स. एलईडी बल्कहेड फिटिंग, पंखे, एक्झॉस्ट फॅन, स्विचेंस, प्लग, वितरण बोर्ड, एमसीवी, मुख्य नियंत्रण पॅनल काढणे व रिवायरिंग करुन नवीन बसवणे. फिल्टरेशन प्लांट व उपकरणाची कामे, विद्यमान एम.एस.टाकी काढणे व त्याची वजावट घेणे. आडवा फिल्टरेशन (३ नग) चा पुरवठा, प्रतिष्ठापना, चाचणी व कमिशनिंग करणे आदी कामे करून घेण्यात येणार आहे. शिवाय फिल्टरेशन टाकी मधील गाळण्याची वाळुचा पुरवठा करणे, फिल्टरेशन प्लांटमध्ये वाळू भरणे, चाचणी करून तो चालू करणे. सध्याच्या सर्व बटरफ्लाय व्हॉल्व्हपैकी कार्यरत नसलेले बटरफ्लाय व्हॉल्व्ह बदलणे आदी कामेही करून घेण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे साडे अकरा कोटी रुपये खर्च केले जाणार असून या कामांसाठी कनक कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Mulund Swimming Pool)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community