Repo Rate Cut : रेपोरेट कपातीनंतर तुमचा हफ्ता किती रुपयांनी कमी होणार?

Repo Rate Cut : साधारणपणे १ लाख रुपयांच्या कर्जावर वार्षिक ३२४ रुपयांची बचत होऊ शकेल.

108
Repo Rate Cut : रेपोरेट कपातीनंतर तुमचा हफ्ता किती रुपयांनी कमी होणार?
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेनं २०२५ वर्षातील आपल्या पहिल्या पतधोरणात रेपोदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे आणि हा दर आता ६.२५ टक्क्यांवर आला आहे. याचा थेट परिणाम कर्जावरील व्याजदरांवर होणार असून येत्या काळात किरकोळ ग्राहकांचे कर्जावरील हफ्ते कमी होऊ शकतील. गृह, वाहन, शैक्षणिक, सुवर्ण अशा सर्व नवीन कर्ज स्वस्त होती. तर फ्लोटिंग रेट असलेली सध्याची कर्जही हफ्ता कमी कमी बसल्यामुळे हलकी होतील. साधारण एक लाख रुपये कर्जासाठी वार्षिक ३२४ रुपयाची बचत होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. (Repo Rate Cut)

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री आणि दिल्ली चांदणी चौक लोकसभेचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी २५ बेसिस पॉईंटची कपात करण्याच्या आरबीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं. यामुळं व्यापार आणि ग्राहकांना कर्ज घेण्याच्या खर्चात कमी येईल. गृह आणि व्यवसाय कर्ज घेतल्यास त्यातून लोकांना त्यातून दिलासा मिळेल. परिणामी नागरिकांच्या क्रयशस्कतीत वाढ होईल. यामुळं बाजारात भांडवल वाढेल. व्यावसायिक गुंतवणूक वाढेल, आर्थिक घडामोडींना गती मिळेल, असं खंडेलवाल म्हणाले. (Repo Rate Cut)

(हेही वाचा – Delhi Assembly Results : केजरीवालांच्या पराभवावर स्वाती मालीवाल यांचे सुचक ट्विट; म्हणाल्या ‘रावण का भी…’)

मध्यवर्ती बँकेच्या रेपो रेटच्या दर कपातीच्या निर्णयानं गृह कर्जाच्या काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घ्या – 

समजा एखाद्या व्यक्तीचं गृह कर्ज २५ लाख रुपयांचं आहे. सध्या ८.७५ टक्के व्याज दरानं त्याला दरमहा २२,०९३ रुपये ईएमआय भरावा लागतोय. तर, रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट कमी केल्यानं व्याज दर ८.५० टक्क्यांवर आल्यास ईएमआय म्हणून २१,६९६ रुपये द्यावा लागेल. म्हणजेच एका ईएमआयमध्ये त्याचे ४०३ रुपये वाचतील. म्हणजेच एका वर्षात ४,८३६ रुपये वाचणार आहेत. (Repo Rate Cut)

जर एखाद्या व्यक्तीचं गृह कर्ज ५० लाख रुपयांचं असल्यास ९ टक्के व्याज दरानं वर्षांसाठी कर्ज घेतलं असल्यास त्याच्या कर्जाचा हप्ता ४४,९८६ रुपये होईल. रेपो रेट कपातीनंतर व्याज दर ८.७५ टक्क्यांवर आल्यास त्याला ईएमआय ४४,१८६ रुपये भरावा लागेल. म्हणजेच दरमहा त्याचे ८०० रुपये वाचतील.एका वर्षात ईएमआयमधून त्याचे ९,६०० रुपये वाचतील. (Repo Rate Cut)

एखाद्या व्यक्तीनं १ कोटी रुपयांचं गृहकर्ज ८.७५ टक्के दरानं २० वर्षांसाठी काढलं असल्यास त्याला दरमहा कर्जाचा हप्ता ८८,३७१ रुपये द्यावा लागतो. मात्र, व्याज दरात कपात होऊन व्याज दर ८.५० टक्के झाल्यास ईएमआयची रक्कम १,५८९ रुपयांनी कमी होईल. संबंधित व्यक्तीला ८६,७८२ रुपये ईएमआय दरमहा भरावा लागेल. वार्षिक १९,०६८ रुपये वाचतील. (Repo Rate Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.