Repo Rate Cut : रेपोदर कमी झाला तरी कर्जाचा हफ्ता कमी झाला नाही तर काय कराल?

Repo Rate Cut : तुमच्या कर्जाच्या अटी-शर्तींची नीट माहिती करून घेणं गरजेचं आहे, कसं ते पाहा

60
Repo Rate Cut : रेपोदर कमी झाला तरी कर्जाचा हफ्ता कमी झाला नाही तर काय कराल?
Repo Rate Cut : रेपोदर कमी झाला तरी कर्जाचा हफ्ता कमी झाला नाही तर काय कराल?
  • ऋजुता लुकतुके 

रिझर्व्ह बँकेनं रेपोदरात ०.२५ अंशांची कपात करून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार असल्याची बातमी सगळीकडे पसरली आहे. २०२३ नंतर पहिल्यांदाच अशी कपात झाल्यामुळे गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज डोक्यावर असलेल्यांसाठी ही आश्वासक बातमी आहे. पण, रेपोदर कमी झाले म्हणजे लगेचच तुमचे कर्जाचे हफ्ते कमी झालेच असतील असं नाही. यापूर्वीही तुम्ही तसा अनुभव अनेकदा घेतलेला असेल. तर असं नेमकं का होतं आणि व्याजदर कमी होऊन कर्जाचा हफ्ता कमी करायचा असेल तर काय करावं लागेल हे समजून घेऊया, (Repo Rate Cut)

(हेही वाचा- Ind vs Eng, 1st ODI : हर्षितचा पदार्पणातच अनोखा विक्रम, तीनही पदार्पणात ३ बळी मिळवणारा पहिला भारतीय)

रेपोदर म्हणजे रेपोदर म्हणजेच रिपर्चेज रेट. केंद्रीय बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देतात तो हा दर आहे. म्हणजेच व्यावसायिक बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन तुम्हाला ते कर्जाऊ देत असतात. मध्यवर्ती बँकेकडून कर्ज कपात झाली तर तो फायदा या बँका आपल्या ग्राहकांनाही देऊ करतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केला तर व्यावसायिक बँकांनीही तो कमी करणं अपेक्षित आहे. असं असताना काहीजणांना हा दर कपातीचा फायदा मिळत नाही. असं का होतं? (Repo Rate Cut)

रेपोदर ही २०१९ ची संकल्पना

याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची कर्जं ही रेपोदराशी जोडलेलीच नसतात. गृहकर्ज क्षेत्रातील तज्ज मोहित गोखले यांनी हा विषय सविस्तर समजावून सांगितला. ‘२०१९ नंतर रेपोदराशी जोडलेली गृहकर्ज ही संकल्पना रुढ झाली. त्यापूर्वी एमसीएलआर वर आधारित व्याजदर आकारला जात होता. २०१२ सालापूर्वी व्याजदर ठरवण्याचे आणखी वेगळे निकष होते. अशावेळी ग्राहकांनी थोडं जागरुक राहून जागतिक बँकिंग यंत्रणेतील हे बदल समजून घेणं आवश्यक आहे. रेपोदर कमी-जास्त झाला तरी आधी घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांवर त्याचा परिणाम होत नाही. तो फक्त एसीएलआर दर कमी – जास्त होण्याने होतो. आणि प्रत्येक बँकेचा एमसीएलआर दर वेगवेगळा असू शकतो,’ असं मोहित गोखले ही संकल्पना समजून देताना म्हणाले. (Repo Rate Cut)

(हेही वाचा- Mahakumbh साठी निघालेल्या 8 दोस्तांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत ; धावत्या बसचा टायर फुटला आणि …)

यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एकतर तुमची कर्ज तुम्ही रेपोदराशी संलग्न करून घेतली पाहिजेत. तुमच्या बँकेकडे विचारणा करून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. लेखी अर्ज करून आणि त्यासाठीचं नियमित शुल्क भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येते. दुसरं म्हणजे निदान वर्षातून एकदा बँकेशी संपर्क करून कर्जविषयक बदल हे समजून घेतले पाहिजेत. तुम्ही घेतलेल्या कर्जाची  नवीन प्रकारच्या कर्जाशी तुलनाही करून बघितली पाहिजे. आणि त्यातून जो दर तुम्हाला स्वस्त पडतो, तो निवडला पाहिजे. (Repo Rate Cut)

बँकाही कर्ज रचनेतील बदल तुम्हाला वेळोवेळी मोबाईल संदेश आणि ईमेलच्या माध्यमातून कळवत असतात. ते समजून घेतले पाहिजेत. आणि नाही समजले तर तज्जांकडून ते समजून घेतले पाहिजेत. (Repo Rate Cut)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : लाहोरचं गद्दाफी स्टेडिअम चॅम्पियन्स करंडकासाठी सज्ज असल्याचा पाकचा दावा)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेपो दरकपात ही ७ फेब्रुवारीला झाली आहे. त्याचे बँकेच्या कर्जरचनेत पडसाद उमटण्यासाठी आणखी सात दिवस जातील. तेव्हा पुढील आठवड्यात बँकेत गेलात तर तुम्हाला तुमच्या कर्जावर नेमका काय परिणाम होईल ते समजेल. मग सध्याचं कर्ज आणि रेपोदराशी संलग्न कर्ज यांचा तौलनिक अभ्यास करून तुम्ही सुयोग्य दर ठरवू शकाल. (Repo Rate Cut)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.