Auto-taxi : नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या, भाडे नाकारणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबर चालकांविरोधातील तक्रारींसाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) हद्दीत एकच व्हाट्सअप नंबर सुरू करण्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी गुरुवारी केली. (Auto-taxi)
(हेही वाचा – HSRP New Deadline: वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली; ‘ही’ आहे अंतिम तारिख)
वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार आणि इतर रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा-टॅक्सी चालकांच्या अरेरावीविरोधात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई आणि मोटार परिवहन विभागाचे रिक्षा-टॅक्सी चालक नियमबाह्य भाडे आकारतात, गैरवर्तन करतात आणि अनेकदा प्रवाशांना इच्छित ठिकाणी सोडण्यास नकार देतात. परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केली होती.
त्यावर मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांनी यापुढे नव्या व्हाट्सअप नंबरवर तक्रार नोंदवावी. एका आठवड्यात संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रासाठी एकच हेल्पलाइन नंबर (whatsapp helpline number) जाहीर केला जाईल. या संदर्भात मोटार परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथक नेमण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. ज्या भागात रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांना त्रास होतो, तिथे वारंवार तपासणी मोहिमा राबवण्याची सूचना देखील सरनाईक यांनी केली.
(हेही वाचा – Sambhal News : राहुल गांधींना संभल न्यायालयाची नोटीस; ४ एप्रिलला उपस्थित रहाण्याचे आदेश)
सध्या अंधेरी प्रादेशिक विभागासाठी ९९२०२४०२०२ हा व्हाट्सअप नंबर (whatsapp complaint numbar) कार्यरत आहे. नव्या नंबरवर व्हाट्सअप तक्रार नोंदल्यानंतर संबंधित चालकाला नोटीस पाठवणे बंधनकारक असेल आणि तक्रारीच्या गंभीरतेनुसार त्याचा परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाईल, असे निर्देश सरनाईक परिवहन विभागाला दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community