धक्कादायक! अर्ध्या लोकांना नकोय नोकरी, हे आहे कारण; अहवालातून माहिती समोर

कोरोना काळात अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या. नोकरी गमावलेल्या लोकांनी कोरोना साथीनंतर नोकरी शोधण्याची धडपड सुरु केली. पण या नोकरीच्या शोधात अनेकांना योग्य नोकरीच मिळत नसल्याने, कंटाळून नोकरीची शोधमोहिम थांबवली असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यात महिलांचा समावेश अधिक आहे. मुंबईतील सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमी या अर्थजगतात मानाचे स्थान असलेल्या संस्थेने भारतीय श्रमशक्ती संदर्भातील विस्तृत अहवाल जारी केला आहे.

2017-22 या कालावधीत एकंदर श्रमशक्ती सहभागाचे प्रमाण 46 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांवर घसरले, महिला कामगारांची अवस्था अधिकच बिकट आहे. 2 कोटी महिला कामगार या श्रमशक्तीतून कायमस्वरुपी बाद झाल्या आहेत. असे सीएमआयईचा अहवाल नमूद करतो. 15-64 या वयोगटातील भारतात 90 कोटी कामगारवर्ग आहे. अमेरिका आणि रशिया यांच्या एकत्रित लोकसंख्येइतका हा आकडा आहे. 90 कोटी कामगारांपैकी निम्म्याहून अधिक लोकांना आता नोकरीच नको आहे.

कारण काय

  • योग्य काम न मिळणे, हे कारण या परिस्थितीला मुख्यत्वे जबाबदार आहे.
  • 2016 मध्ये झालेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळेही रोजगार बाजाराला धक्के बसले.
  • रोजगार निर्मीतीचे चक्र मंदावले. त्यात कोरोनाचा फटका बसला.

( हेही वाचा :म्हाडाच्या 2800 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत, या तारखेपासून करु शकता अर्ज )

हे चित्र हवे

  • जगाच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.
  • या तरुणांच्या हातांना काम मिळवण्यासाठी 2030 पर्यंत किमान 9 कोटी नवीन अकृषक रोजगारांची निर्मीती होणे गरजेचे आहे.
  • ही आदर्श परिस्थिती निर्माण करण्याआधी देशाचा आर्थिक विकास दर 8 ते 8.5 टक्के असणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here