‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’च्या (Reporters Without Borders) एका अहवालातून पत्रकारांसाठी कोणते देश धोकादायक आहेत. यासंदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आरएसएफ (Reporters Without Borders) ही एक माहितीच्या अधिकाराचे रक्षण करणारी आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे. आरएसएफद्वारे (Reporters Without Borders) प्रसिद्ध २०२४ च्या राउंड-अपनुसार, पॅलेस्टाईन (Palestine) हा पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश आहे, त्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशचा (Bangladesh) क्रमांक लागतो. हत्या आणि अपहरणांसह पत्रकारांवरील विविध हल्ल्यांच्या आधारे ही रँकिंग करण्यात आली आहे.
( हेही वाचा : BMC : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी धुळीने माखलेले बॅरिकेड्स महापालिका पाण्याने धुणार)
दरम्यान प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, आरएसएफने (Reporters Without Borders) म्हटले आहे की पत्रकारांवरील लक्ष्यित हल्ल्यांमध्ये विशेषतः राजकीय अशांतता आणि निषेधाच्या वेळी चिंताजनक वाढ झाली आहे. यानुसार पाकिस्तान आणि बांगलादेश (Bangladesh) या दोन्ही देशांत झालेल्या तीव्र निदर्शनांमध्ये ऑन ड्युटीवर असलेल्या अनेक पत्रकारांचा जीव गेला. तसेच बांगलादेशातील सत्तांतराच्या नाट्यादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान पाच पत्रकारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पत्रकारांना लक्ष्य करणे योगायोगाने घडले नाही, कारण अधिकाऱ्यांनी पत्रकारांचे उठावाचे कव्हरेज दडपण्याचा प्रयत्न केला”, असे अहवालात म्हटले आहे.
आरएसएफच्या (Reporters Without Borders) अहवालात सांगण्यात आले आहे की, चीन, म्यानमार आणि इस्रायल सारख्या देशांनी पत्रकारांना त्यांच्या नोकरीच्या वेळी ताब्यात घेतलेल्या देशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. म्यानमारने ६१,चीनने सुमारे १२४ आणि इस्रायलने ४१ पत्रकारांना ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षभरात ५५ पत्रकारांना ओलिस ठेवण्यात आले असून त्यापैकी ३८ सीरियामध्ये, ९ इराकमध्ये, २ मालीमध्ये, ५ येमेनमध्ये आणि १ मेक्सिकोमध्ये ओलिस ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी २५ जणांना ‘आयएसआयएस’ ने ओलीस ठेवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, आरएसएफने म्हटल्यानुसार जगभरात सुमारे १०० पत्रकार सध्या बेपत्ता आहेत. त्यापैकी एक चतुर्थांशहून अधिक गेल्या १० वर्षांत गायब झाले आहेत.
तसेच पुढे असेही म्हटले आहे की, बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी सन २०२४ मध्ये माध्याम स्वातंत्र्यालाही धोका निर्माण केला होता. २०२४ या वर्षामध्ये ५४ पत्रकारांना हल्ल्यामध्ये प्राण गमावावे लागले, त्यापैकी २ महिला होत्या. (Reporters Without Borders) अहवालानुसार ५४ पैकी सुमारे १६ जणांनी पॅलेस्टाईनमध्ये(Palestine) , ७ जणांनी पाकिस्तानात, ५ जणांनी बांगलादेशात (Bangladesh), ५ जणांनी मेक्सिकोमध्ये आणि ४ जणांचा सुदानमध्ये मृत्यू झालाय तसेच अहवालानुसार, अर्ध्याहून अधिक पत्रकारांचा संघर्षग्रस्त परिसरात वार्तांकन करताना मृत्यू झाला. याप्रकरणी बांगलादेशमधील अंतरिम सरकारने अलीकडेच मान्य केले आहे की गेल्या साडेतीन महिन्यांत अशा सुमारे ८८ घटना घडल्या आहेत. तसेच बांगलादेशातील माध्यम व्यवसायिकांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून धमक्यांता सामना करावा लागतो.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community